वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजमधील अभिनेता राजेश तैलंग यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते चक्क रस्त्यावर रामलड्डू विकताना दिसत आहेत. ‘Mirzapur’ actor Selling Ramaldu; The photo viral on social media
गुड्डूभैया म्हणजे अभिनेता अली फझलच्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली आहे. ‘‘लॉकडाऊन संपेल, कोरोना जाईल आणि तेव्हा पुन्हा कामाला नव्याने सुरुवात करू,’’ अशी कॅप्शन त्यांनी फोटोला दिली.
मिर्झापूर या वेबसिरीजच्या दोन्ही भागांमध्ये राजेश तैलंग यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ती प्रचंड गाजली आहे. सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमधून लॉकडाऊन दरम्यान कलाकारांचे होत असलेले हाल सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आतापर्यंत अनेक कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांनी सोशल मीडियावरून त्यांची व्यथा मांडली होती. दरम्यान, राजेश यांचा फोटो पाहून चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींना हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपटातील असल्याचे वाटत आहे तर काहींना राजेश यांच्यावर कोसळलेल्या आर्थिक संकटाचा असल्याचे वाटत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App