मंत्र्यांना हिंदी येत नसल्याने अधिकाऱ्यांची भाषा समजेना, अधिकाऱ्यांना मंत्र्यांची भाषा बोलता येईना, मुख्यमंत्री म्हणाले आमची भाषा येणारे अधिकारी पाठवा

विशेष प्रतिनिधी

इंफाळ : मंत्र्यांना हिंदी येत नसल्याने अधिकाऱ्यांची भाषा समजेना आणि अधिकाऱ्यांना मंत्र्यांची भाषा येईना अशी परिस्थिती मिझोराममध्ये झाली आहे. त्यामुळे आमची भाषा येणारे अधिकारी पाठवा अशी विनंती मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.Ministers do not understand the language of officials as they do not know Hindi, officials cannot speak the language of ministers, CM says send officials who speak our language

मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून मागणी करताना राज्याच्या मुख्य सचिवांना मिझो भाषेमधील कारभार समजत नसल्याने त्यांच्याऐवजी स्थानिक भाषा समजणाऱ्याला पदावर नियुक्त करावे असे म्हटले आहे. आपल्या मंत्रीमंडळामधील एकाही मंत्र्याला हिंदी भाषा कळत नाही त्यामुळे मुख्य सचिव हा मिझो भाषेचे ज्ञान असणारा असावा.



मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव सीजे रामथंगा यांची नियुक्ती करण्यात यावी आणि सध्या या पदावर असणाºया रेणू शर्मा यांची बदली करावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. माझ्या कार्यालयामध्ये काम करणारे माजी मुख्य सचिव लालनूमाविया चुआंगो हे गुजरात कॅडरचे अधिकारी निवृत्त झाल्यानंतर मी माझे सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. सी. रामथंगा (मणीपूर कॅडर) यांना मुख्य सचिव करण्याची मागणी केली होती. मात्र गृहमंत्रालयाने रेणू शर्मा यांना मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले, असे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी म्हटले आहे.

रेणू यांची मुख्य सचिवपदी २८ ऑक्टोबर रोजी नियुक्ती झाल्यानंतर दुसºयाच दिवशी हे पत्र पाठवण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून रेणू यांनी कार्यभार स्वीकारला. ज्या दिवशी रेणू यांची नियुक्ती झाली त्याच दिवशी मिझोरम सरकारने रामथंगा यांना मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता राज्यात केंद्राकडून नियुक्त करण्यात आलेल्या रेणू शर्मा आणि राज्याने नियुक्त केलेले रामथंगा असे दोन मुख्य सचिव आहेत.

मिझो लोकांना हिंदी भाषा समजत नाही. माझ्या मंत्रीमंडळामधील कोणत्याही मंत्र्याला हिंदी समजत नाही. काहींना तर इंग्रजी भाषेबाबतही अडचणी आहेत. त्यामुळेच अशी पार्श्वभूमी असताना मिझो भाषाची माहिती नसणाऱ्या व्यक्तीला मुख्य सचिवपदी नियुक्त करणे हे परिणामकारक ठरणार नाही. राज्याची निर्मिती झाल्यापासून भारत सरकारने कधीच मिझो भाषेची जाण नसणाऱ्या व्यक्तीला मुख्य सचिवपदी नियुक्त केलेले नाही.

मिझोरमची निर्मिती झाल्यापासून केंद्रात युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असं कधीच घडलं नव्हतं. इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांची मुख्य भाषा ठाऊक नसणाऱ्या व्यक्तीला मुख्य सचिव म्हणून नियुक्त करत नाहीत,असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.आपण एनडीएचे विश्वासू सहकारी असून आपली ही मागणी मान्य होईल अशी अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Ministers do not understand the language of officials as they do not know Hindi, officials cannot speak the language of ministers, CM says send officials who speak our language

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात