MI vs RCB IPL 2021:हर्षल पेटेलचे रिकॉर्डतोड़ प्रदर्शन ; जेमिसनचे बॅटतोड परफॉरमंस ; चेन्नईत बेंगलोर एक्सप्रेस सुसाट


  • रॉयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी सलामी
  • हर्षल पटेलने 27 धावा देऊन 5 बळी घेतले
  • हर्षल पटेल आणि एबी डिव्हिलियर्स हे RCB विजयाचे नायक
  • मरिना बीचच्या साक्षीने मॅक्सवेलचा उत्तुंग सिक्स

विशेष प्रतिनिधी

चेन्नई :मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे झालेला आयपीएल 2021 चा पहिला सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर 2 विकेट्सने विजय मिळवला . MI vs RCB IPL 2021: Hershel Patel’s record-breaking performance; Jamison’s bat breaking performance; Bangalore Express Susat in Chennai

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी धुव्वादार फटकेबाजी करत सामन्याची दमदार सुरुवात केली. परंतु इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलने आश्चर्यकारक गोलंदाजी केली.

त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात 4 षटकांत 27 धावा देऊन 5 बळी घेतले. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे आरसीबीने मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 159 धावांवर रोखले.

यासह, हर्षल पटेल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात विराट सेनेने शेवटच्या बॉलवर हा सामना जिंकला. या विजयासह आरसीबीच्या खात्यात दोन गुण जोडले गेले. त्याचवेळी मुंबई संघाने पुन्हा एकदा आयपीएलचा पहिला सामना गमावला. 2013 पासून मुंबई  आपला पहिला आयपीएल सामना जिंकण्यात अपयशी ठरत आहे.

दरम्यान बेंगलोरचा नवोदित वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याच्या अप्रतिम चेंडूने कृणाल पंड्या याची तोडली. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, हा २६ वर्षीय जेमिसनचा पदार्पणाचा आयपीएल सामना होता. या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत १ महत्त्वाची विकेट घेतली. कृणाल पंड्या हा त्याची पहिली आयपीएल शिकार ठरला.

आज नवीन प्रयोगासह किंग कोहलीने वॉशिंग्टनच्या साथीने संघाच्या डावाला सुरुवात केली.

मॅक्सवेलने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. 28 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या तर क्रृणाल पांड्याच्या अखेरच्या चेंडूवर त्याने मारलेला षटकार डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. मरिना बीचच्या दिशेने 100 मीटर उत्तुंग मारलेला फटका पाहून कोहलीही आवाक झाला.

https://twitter.com/OneCricketApp/status/1380565616881332225?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1380565616881332225%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-33857097361602246285.ampproject.net%2F2103261048002%2Fframe.html

विराट कोहलीने कृणाल पांड्याचा कॅच सोडला. विराटच्या हातातून बॉल बाहेर पडला आणि थेट डोळ्याला लागला. बॉल लागला तरी विराट मैदानातच राहिला.

हर्षल पटेल सामनावीर

हर्षल आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

MI vs RCB IPL 2021: Hershel Patel’s record-breaking performance; Jamison’s bat breaking performance; Bangalore Express Susat in Chennai

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात