पंजाब नॅशनल बँकेला बुडविणाऱ्या मेहूल चोक्सीने मैत्रीणींवर उधळत होता कोट्यवधी रुपये, गर्लफ्रेंडला याटचा शौक


पंजाब नॅशनल बॅँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक करून पळालेला मेहूल चोक्सी त्याच्या मैत्रीणींवर कोट्यवधी रुपये उधळत होता. आपल्या एका गर्लफ्रेंडला याटची सफर करण्यासाठी डॉमिनिकाला गेला असताना त्याला अटक करण्यात आली. याटवर त्याच्यासोबत मजा करण्यासाठी गेलेली गर्लफ्रेंड गुंतवणूक सल्लागार आहे. तिला छानछौकीत राहण्याची आवड आहे.Mehul Choksi, who drowned Punjab National Bank, was wasting crores of rupees on his girlfriends.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक करून पळालेला मेहूल चोक्सी त्याच्या मैत्रीणींवर कोट्यवधी रुपये उधळत होता. आपल्या एका गर्लफ्रेंडला याटची सफर करण्यासाठी डॉमिनिकाला गेला असताना त्याला अटक करण्यात आली.

याटवर त्याच्यासोबत मजा करण्यासाठी गेलेली गर्लफ्रेंड गुंतवणूक सल्लागार आहे. तिला छानछौकीत राहण्याची आवड आहे.चोक्सी याने अ‍ॅँटिगुआ देशाचे नागरिकत्व घेतले आहे. कोट्यवधी रुपये असलेल्या चौक्सीने तेथील राजकीय पक्षांवरही पैशाची उधळण केलेली आहे.त्याचबरोबर मैत्रीणींवरही तो कोट्यवधी रुपये उधळत असतो. अ‍ँटिगुआतून गर्लफ्रेंड बबारा जराबिका हिच्याबरोबर मजा करण्यासाठी तो डॉमिनिकामध्ये आला होता.भारतातील एक मोठा हिरे व्यापाी असलेल्या चोक्सीने पंजाब नॅशनल बॅँकेची १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यावर देश सोडून तो पळून गेला. त्यानंतर याच पैशाच्या ताकदीवर कॅरेबियन देश असलेल्या अ‍ॅँटिगुआमध्ये स्थायिक होऊन तेथील नागरिकत्वही त्याने घेतले.

मेहूल अ‍ॅँटिगुआमध्ये आपली गर्लफ्रेंड बबारासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी मजा करण्यासाठी दोघांनी एक याट भाड्याने घेतली होती. या याटमधूनच ते शेजारील देश असलेल्या डॉमिनिकाला गेले होते. तेथेच त्याला अटक करण्यात आली.

बबारा जराबिका लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकसमध्ये शिकलेली असून गुंतवणूक सल्लागार आहे. गेल्या एक वर्षांपासून ती मेहूलसोबत राहत होती. बबाराला छानछौकीच्या आयुष्याची प्रचंड आवड आहे.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असलेल्या फोटोमध्ये अनेकदा लक्झरी यॉटमध्ये समुद्रात मौज करताना दिसते. त्याचबरोबर तिला प्रवासाची प्रचंड आवड आहे.मेहूल चोक्सीला अटक करण्यात आल्यावर बबारा रहस्यमयरित्या गायब झाली आहे.

Mehul Choksi, who drowned Punjab National Bank, was wasting crores of rupees on his girlfriends.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण