मेहबूबा मुफ्तींना कुलगामला जाण्यापासून रोखले, नजरकैदेत ठेवल्याचा केंद्र सरकारवर आरोप


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर – जम्मू-काश्मीsरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी घरात नजरकैद केल्याचा आरोप केला आहे. काश्मी्र खोऱ्यातील स्थिती सामान्य असल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचेही म्हटले आहे. Mehbooba Mufti targets central govt.

मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या दौऱ्यावर मला जायचे होते, पण घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. मला नजरकैदेत ठेवले आहे.



प्रशासनाच्या म्हणण्यानुसार काश्मीीरमधील परिस्थिती चांगली नाही. यातूनच खोऱ्यात सर्व सुरळीत असल्याचा त्यांचा दावा खोटा असल्याचे लक्षात येते.

अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या अधिकाराबद्दल भारत सरकार चिंता व्यक्त करीत असताना काश्मिीरी नागरिकांचे हक्क मात्र डावलले जात आहेत, अशी टीका करीत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. नजरकैदेत ठेवल्याच्या दाव्याबरोबरच मेहबूबा मुफ्ती यांनी बंद दरवाजे आणि त्याच्याजवळ तैनात असलेले सशस्त्र ट्रकचे छायाचित्रही ट्विट केले आहे.

Mehbooba Mufti targets central govt.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात