विनायक ढेरे
विविध राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येताना केंद्रातील मोदी सरकार विरोधक एकत्रपणे आणि वेगवेगळे अशा दोन्ही तऱ्हेने सरकारला घेरायला सिद्ध झाले आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी तामिळनाडूतील कन्याकुमारी मधून सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि राष्ट्रीय अधिवेशन राजधानी नवी दिल्लीत सुरू झाले आहे. Meeting at Nessamoni Christian College during Congress visit
हिंदू हेट स्पीचकार फादर जॉर्ज यांची भेट
भारत जोडो यात्रेच्या सुरुवातीलाच राहुल गांधी हे 41000 रुपयांचा बर्बेरी टी-शर्ट घातल्याने चर्चेत आले आहेत. ही चर्चा वेगवेगळ्या दिशेने जाऊन थांबते ना थांबते तोच राहुल गांधींनी तामिळनाडूतील वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरू फादर जॉर्ज पोन्नैया यांची कन्याकुमारीतील चर्चमध्ये भेट घेऊन त्यांच्याकडून येशू ख्रिस्त देव “समजून” घेतला आहे. फादर जॉर्ज पोन्नैया यांनी देखील येशू ख्रिस्त हा आपल्यातला जीता जगता देव होता. तो शक्तीस्वरूप वगैरे काही नव्हता, असे रूप राहुल गांधी यांना समजून दिले आहे. हे तेच फादर जॉर्ज पोनैय्या आहेत, ज्यांना तामिळनाडू सरकारने हिंदू हेट स्पीच बद्दल 2021 मध्येच अटक केली होती. फादर जॉर्ज यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी कन्याकुमारीमधी नेसामोनी मेमोरियल ख्रिश्चन कॉलेजमध्ये विविध कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले योगेंद्र यादव देखील सामील झाले होते.
तमिलनाडु: कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कन्याकुमारी के नेसामोनी मेमोरियल क्रिश्चियन कॉलेज में डिसेबल राइट्स एक्टिविस्ट के साथ बातचीत की। pic.twitter.com/VGQ0iKFuBN — ANI_HindiNews (@AHindinews) September 10, 2022
तमिलनाडु: कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कन्याकुमारी के नेसामोनी मेमोरियल क्रिश्चियन कॉलेज में डिसेबल राइट्स एक्टिविस्ट के साथ बातचीत की। pic.twitter.com/VGQ0iKFuBN
— ANI_HindiNews (@AHindinews) September 10, 2022
बिल्किस बानू प्रकरणी राष्ट्रवादीला चिंता
एकीकडे राहुल गांधी तामिळनाडूतील ख्रिश्चन समुदायाला भेटून काँग्रेसचा संघटनात्मक पाठिंबा वाढवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नवी दिल्लीतून केंद्र सरकारवर तोफा डागायला सिद्ध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर भरणार असून त्याआधीची राष्ट्रीय विस्तारित कार्यकारणीची बैठक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली आहे. या बैठकीत त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच गुजरात मधील बिल्कीस बानू प्रकरणाविषयी देखील चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले. परंतु वर्षभर शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. शेतकरी हिताच्या विरोधात असलेले कायदे भाजप सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेविना संमत केले होते, असा आरोप त्यांनी केला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून महिला सन्मानाचे भाषण करतात पण त्यानंतर दोनच दिवसात त्यांच्याच पक्षाचे गुजरात मधले सरकार बिल्किस बानू अत्याचार प्रकरणातील आरोपींना सोडून देते हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीचे “अल्पसंख्यांक” मुद्दे!!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात देशाला भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांवर व्यापक विचारविनिमय केला जाईल, अशी माहिती पवारांनी दिली या राष्ट्रीय अधिवेशनाची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी घेतल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन स्वतंत्र पक्ष अनुक्रमे दक्षिण आणि उत्तरेतून केंद्रतील मोदी सरकार विरुद्ध हल्लाबोल करायला अशा प्रकारे सिद्ध झाले आहेत आणि त्यांनी आपापली हल्लाबोलाची “केंद्रे” देखील निश्चित केल्याचे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App