आजच्या प्रजासत्ताक दिनापासून रेल्वेत बदलणार जेवणाचा मेन्यू; भेळपुरी, मोमोजसह १० प्रादेशिक पदार्थ उपलब्ध


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात रेल्वेचे जाळे सर्वत्र पसरले असल्याने रेल्वे प्रवाशांना नवनव्या सुविधा देते. रेल्वेच्या नव्या सुविधा पाहून प्रवाशांना आनंद मिळणार आहे. लांबच्या प्रवासात अनेकदा जेवणाची गैरसोय होते यामुळेच रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केला आहे. Meal menu to change in railways from today’s Republic Day; 10 regional dishes available including Bhelpuri, Momos

रेल्वे प्रवाशांना आता प्रवासात प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. लिट्टी – चोखा ते इडली – सांभारापर्यंत असे सर्व प्रादेशिक पदार्थ प्रवाशांना रेल्वेत मिळणार आहेत. तसेच जैन समाजाच्या लोकांसाठी शुद्धा शाकाहारी भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आहे.

मधुमेहाचा त्रास असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये उकडलेल्या भाज्या आणि ओट्स सुद्धा दिले जाणार आहेत. रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये आठ डिशचा समावेश केला आहे. नव्या बदलानंतर ट्रेनमध्ये आत लहान बाळांसाठी सुद्दा जेवण व्यवस्था करण्यात येणार आहे. राजधानी, दुरांतो, शताब्दी आणि वंदे भारत या सर्व प्रीमियम ट्रेनमध्ये २६ जानेवारीपासून हा बदल लागू करण्यात येणार आहे.

वाचा नवा मेन्यू

लिट्टी चोखा, इडली सांभार, डोसा, वडापाव, पावभाजी, भेळपुरी, खिचडी, झालमुडी, व्हेज- नॉन व्हेज मोमोज, स्प्रिंग रोल आदी प्रादेशिक पदार्थ ट्रेनमध्ये मिळणार आहेत.

कांदा-लसूणशिवाय जैन भोजनही दिले जाणार आहे, एखाद्याला मधुमेहाचा त्रास असेल तर उकाडलेल्या भाज्या, मिल्क ओट्स, मिल्क – कॉर्न फ्लेक्स, अंड्याचा पांढरा भाग घेऊन केलेले ऑम्लेट इत्यादी पदार्थही रेल्वेत मिळणार आहेत.

दक्षिण भारतीय प्रवाशांना नाचणीचे लाडू, नाचणीची कचोरी, नाचणीची इडली, नाचणी डोसा, नाचणी पराठा, नाचणी उपमा मिळेल.

Meal menu to change in railways from today’s Republic Day; 10 regional dishes available including Bhelpuri, Momos

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात