Massive blast at a chemical factory in Gujarat : गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात गुरुवारी (16 डिसेंबर) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. Massive blast at a chemical factory in Gujarat; Two were killed and at least 15 were injured
वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात गुरुवारी (16 डिसेंबर) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचमहाल जिल्ह्यात गुजरात फ्लोरो केमिकल फॅक्टरी असून त्यामध्ये गुरुवारी सकाळी मोठा स्फोट झाला. या अपघातात कारखान्यातील दोघांचा मृत्यू झाला. त्याचवेळी इतर १५ जण गंभीर जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंचमहाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. अद्याप या दुर्घटनेचे कारण समोर आलेले नाही.
दरम्यान, पंचमहालच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी म्हटले की, ही घटना सकाळी १० वाजता घडली. त्यादरम्यान प्लांटला आग लागून 15 कारागीर जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
Massive blast at a chemical factory in Gujarat; Two were killed and at least 15 were injured
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App