कोलकता – पश्चि म बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा कोरोना लशीच्या टंचाईबाबत केंद्राकडे तक्रार केली आहे. कमी लसीबद्दल दीदी भडकल्या असून यासाठी त्यांनी केद्राला जबाबदार धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले असून लशीचा पुरवठा वाढवला नाही तर बंगालची स्थिती गंभीर होवू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.Mammatadidi wrote letter to PM Modi
बंगालमधील प्रत्येक बाबीकडे आता राजकारणाच्या चष्म्यातूनच पाहिले जात आहे. त्यामुळे ममतादिदींच्या ताज्या पत्रालाही राजकीय किनार असल्याचे मानले जाते. राज्यातील लसीकरणाचा सारा मामला केंद्रावर ढकलण्याचा दीदींचा डाव आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालला सुमारे चौदा कोटी डोसची गरज असल्याचे नमूद केले आहे. राज्यात आतापर्यंत १५,३०,८५० जणांना कोरोनाची लागण झाली तर १८,१८० जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेनुसार पश्चिजम बंगालमधील सुमारे ९.५ लाख शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर केल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अर्जाचा पुनर्विचार करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App