ममतांची मोठी घोषणा 30 नोव्हेंबरला मुंबईत येऊन ठाकरे – पवारांना भेटणार!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज देशाच्या राजकारणात संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे त्या प्रयत्न करत आहेत. यासाठीच्या येत्या 30 नोव्हेंबरला मुंबईत येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत.Mamata’s big announcement will come to Mumbai on November 30 to meet Thackeray-Pawar

ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ७, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली पश्चिम बंगालच्या काही मुद्द्यांवर त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. तसेच सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ यांची कार्यकक्षा वाढविण्यावर त्यांनी आक्षेप नोंदविला.



त्यानंतर पत्रकारांना ममता बॅनर्जी यांनी या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेत मी त्रिपुरातील हिंसाचाराचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

येत्या 30 नोव्हेंबरला मी मुंबईत जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे. सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आम्हाला साथ देतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना जर मदत आपली मदत हवी असेल तर ती करण्यास तयार असल्याचे देखील ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.ममता बॅनर्जी या आत्तापर्यंत पश्चिम बंगाल नंतर आसाम, त्रिपुरा, मणिपूर, गोवा, दिल्ली, हरियाणा या छोट्या राज्यांपुरत्या राजकीय दौऱ्यांचे बोलत होत्या. परंतु प्रथमच त्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या दौऱ्याबाबत बोलल्या आहेत. महाराष्ट्रात येऊन त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Mamata’s big announcement will come to Mumbai on November 30 to meet Thackeray-Pawar

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात