Mamata Eid Ul Fitr : ममता बॅनर्जींचे निवडणुकीपूर्वी “टेम्पल रन”; पण जिंकून आल्यानंतर “ईद-उल-फित्र”ला भाषण!!


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवळा – देवळात जाऊन प्रार्थना करत होत्या. कालीमातेची आरती करताना घंटा वाजवत होत्या. आपण कायस्थ ब्राह्मण असे वारंवार सांगत होत्या. हे करताना आपण “हिंदू” असल्याचे ते बंगाली मतदारांवर ठसविण्याचा प्रयत्न करत होत्या. पण आता निवडणूक संपली त्या जिंकून आल्या आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपले “अस्सल रंग” दाखवायला सुरुवात केली आहे. Mamata Eid Ul Fitr: Mamata Banerjee’s “Temple Run” before the election

विधानसभा निवडणुकीपूर्वी “टेम्पल रन” करणाऱ्या ममता बॅनर्जी आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्हे, तर ईद-उल-फित्रच्या निमित्ताने भाषण करताना दिसल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये शांतता आणि सुव्यवस्था आहे. हे बंगाल प्रगतीच्या दिशेने निघाला आहे. हे पाहून ते जळतात, अशा शेलक्या शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शरसंधान साधले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम सुरक्षित आहेत. त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांना (मोदींना) देशात इतरत्र काय करायचे ते करु द्या. आपण येथे शांततेत राहायचे आहे. अच्छे दिन नक्की आपणास आणायचे आहेत आणि ते येतीलच, अशी भाषा देखील ममता बॅनर्जी यांनी वापरली आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर आधी ईद-उल-फित्रच्या सदिच्छा दिल्या आहेत आणि त्यानंतर अक्षय तृतीया च्या शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणुकीत जिंकून आल्यानंतर आपला प्राधान्यक्रम बदलल्याचे त्यांनी ट्विटरवर सुद्धा दाखवून दिले आहे.

Mamata Eid Ul Fitr: Mamata Banerjee’s “Temple Run” before the election

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात