वृत्तसंस्था
कोलकाता : आज 2 मार्चला अनेक राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे आणि पोटनिवडणुकांचे निकाल लागले. पण मराठी माध्यमांनी मात्र कसब्यात भाजप हरल्याच्या बातम्यांवर एवढे कॉन्सन्ट्रेट केले, की देशात इतरत्र पोटनिवडणूक आहेत किंवा ईशान्य भारतातल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत, याकडे मराठी माध्यमांचे पूर्ण दुर्लक्ष झाले. कसब्यातल्या भाजपच्या पराभवाने काँग्रेस – राष्ट्रवादी – ठाकरे गट जेवढे हुरळून गेले नाहीत, तेवढी मराठी माध्यमे हुरळली आहेत. Mamata banerjee’s TMC got 15 % in meghalaya, but lost its bastion in west bengal sagardighi constituency
या पार्श्वभूमीवर केवळ पुण्यातच “कसबा” घडला असे नव्हे, तर पश्चिम बंगाल मध्ये देखील असाच एक “कसबा” झाल्याच्या घटनेकडे माध्यमांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. पुण्यातला कसबा हा जसा भाजपचा बालेकिल्ला 32 वर्षांनी ढासाळला, तसाच पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसचा एक बालेकिल्ला 2011 नंतर ढासळला आहे. सागरदिघी असे या मतदारसंघाचे नाव आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मेघालयात स्वतःची तृणमूळ काँग्रेस पार्टी रुजवून राष्ट्रीय पार्टी बनवायला गेल्या, पण सागरदिघीचा मात्र “कसबा” करून बसल्या. अशीच अवस्था आज तृणामूळ काँग्रेसची झाली आहे. तृणमूळ काँग्रेसला मेघालयात 15 % मते मिळाली आहेत. पण पश्चिम बंगालच्या सागरदिघी मतदार संघात मात्र तृणमूळ काँग्रेसचे उमेदवार हरला आहे.
सागरदिघी या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजप किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नव्हे, तर राहुल गांधींच्या काँग्रेसने तृणमूळ काँग्रेसचा पराभव केला आहे. काँग्रेसचा आता पश्चिम बंगाल विधानसभेत एकमेव आमदार सागरदिघीतून असणार आहे.
मैं मेघालय के लोगों को बधाई देना चाहती हूं। हमने 6 महीने पहले ही यहां शुरूआत की थी और हमें 15% वोट मिला है। यह TMC को राष्ट्रीय पार्टी के तौर पर मज़बूत करेगा: पश्चिम बंगाल CM ममता बनर्जी pic.twitter.com/hM8Arw27ve — ANI_HindiNews (@AHindinews) March 2, 2023
मैं मेघालय के लोगों को बधाई देना चाहती हूं। हमने 6 महीने पहले ही यहां शुरूआत की थी और हमें 15% वोट मिला है। यह TMC को राष्ट्रीय पार्टी के तौर पर मज़बूत करेगा: पश्चिम बंगाल CM ममता बनर्जी pic.twitter.com/hM8Arw27ve
— ANI_HindiNews (@AHindinews) March 2, 2023
सागरदिघी का उपचुनाव हम हार गए। मैं किसी को दोष नहीं देना चाहूंगी लेकिन यहां एक अनैतिक गठबंधन है जिसकी हम मज़बूती से आलोचना करेंगे। CPI(M)-कांग्रेस तो साथ है ही और भाजपा के वोट भी कांग्रेस को ट्रांसफर हुए हैं। आप ये सब चोरी-छुपे क्यों कर रहे हैं: पश्चिम बंगाल CM ममता बनर्जी pic.twitter.com/kpzA2OO7RF — ANI_HindiNews (@AHindinews) March 2, 2023
सागरदिघी का उपचुनाव हम हार गए। मैं किसी को दोष नहीं देना चाहूंगी लेकिन यहां एक अनैतिक गठबंधन है जिसकी हम मज़बूती से आलोचना करेंगे। CPI(M)-कांग्रेस तो साथ है ही और भाजपा के वोट भी कांग्रेस को ट्रांसफर हुए हैं। आप ये सब चोरी-छुपे क्यों कर रहे हैं: पश्चिम बंगाल CM ममता बनर्जी pic.twitter.com/kpzA2OO7RF
सागरदिघी मतदारसंघ हा तृणमूळ काँग्रेसच्या स्थापनेपासून त्याच पक्षाकडे राहिला होता. पण 2023 च्या पोटनिवडणुकीत मात्र पक्षाला हा मतदारसंघ काँग्रेस मुळे गमवावा लागला. काँग्रेस उमेदवार तगडा नव्हता. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भाजप यांनी आतून काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केली. स्वतःची हक्काची मते त्या उमेदवाराकडे वळवली, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचवेळी त्यांनी मेघालयात तृणमूल काँग्रेसला 15 % मते मिळालीत आणि पक्षाची वाटचाल राष्ट्रीय पार्टी होण्याकडे दमदारपणे सुरू आहे, असा दावाही केला आहे.
पण एकीकडे तृणमूळ काँग्रेस राष्ट्रीय पार्टी व्हायला निघाली असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र परंपरागत बालेकिल्ला ढासळताना ममतादीदींना बघावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App