बंगाली आंब्यांच्या गोडीने हिंदूंच्या रक्ताचे डाग कसे दिसेनासे होतील…??!!


नाशिक – ममता बॅनर्जींनी केंद्रातल्या नेत्यांना बंगाली आंब्याच्या पेट्या पाठविल्या आणि केंद्र – राज्य संबंधांची चर्चा माध्यमांनी सुरू केली. आंब्याच्या गोडीतून मोदी – शहा –ममतांचे संबंध मधूर होणार का वगैरे मुद्द्यांवर चर्चांचे रतीब घातले… पण कोणीही खऱ्या मुद्द्यावर चर्चा केलीच नाही किंवा त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले. Mamata banerjee sends mangos to PM narendra modi and amit shah… will modi – shah relent to this mango diplomacy?

खरा मुद्दा ममतांनी आंबे पाठवून मोदी – शहांशी राजकीय मांडवली करण्याचा नाहीच. खरा मुद्दा आहे, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक काळात आणि निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या अभूतपूर्व हिंसाचाराचा आणि हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा.

हा हिंसाचार आणि अत्याचार एवढा भयानक आहे, की पश्चिम बंगालमधील ९ जिल्ह्यांमधल्या शेकडो गावांमधील हजारो हिंदूंना आपापल्या गावातून विस्थापित व्हावे लागले आहे. तृणमूळ काँग्रेसच्या म्हणा किंवा कोणत्याही पक्षाच्या म्हणा मुस्लीम गुंडांनी त्यांचे जीणे हैराण करून सोडले होते म्हणूनच त्यांना विस्थापित व्हावे लागले आहे. तेथे झालेल्या मारहाण, खून, बलात्काराच्या घटना तर थेट भारत – पाकिस्तान फाळणीची आठवण करून देण्याएवढ्या भयानक आहेत. हे सगळे स्वतंत्र भारतातल्या पश्चिम बंगाल नावाच्या राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले ममता बॅनर्जींचे सरकार अस्तित्वात असताना घडले आहे.



बंगालमधल्या निवडणूकीनंतरच्या हिंसाचाराची आणि अत्याचाराची संपूर्ण जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्या सराकारची आहे. पण त्या विरोधात ब्र न काढता मीडियाने आज ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि गृहमंत्री अमित शहांना पाठविलेल्या आंब्यांच्या पेट्यांच्या चर्चा रंगविल्या आहेत. जणू काही त्या आंब्याच्या पेट्या पत्रकारांच्या घरी पोहोचल्या आहेत आणि त्या आंब्यांची गोडी त्यांनाच चाखत आली आहे…!!

बंगाली सुप्रसिद्ध हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग या जातींच्या आंब्यांची चव मोठी न्यारी असेलही. ममतांनी राष्ट्रपती – उपराष्ट्रपतींसकट मोदी – शहा या केंद्रातल्या नेत्यांना पाठविलेले आंबे मधूरही असतील. पण त्यामुळे बंगालमध्ये निवडणूकीच्या काळात आणि निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची आणि अत्याचारांची भरपाई कशी होणार…?? तिथे हजारो हिंदूंचे रक्त सांडलेय, त्याचे ममता सरकारवर उडालेले डाग कसे पुसणार…?? मोदी – शहांना तरी हे आंबे गोड लागतील काय…?? आणि लागलेच तर हिंदूंचा कैवार घेणाऱ्या पक्षाचे नेते असे तरी त्यांना कोणी म्हणतील काय…??

तेव्हा आंब्यांच्या पेट्या आणि गोडगुलाबी चर्चा वगैरे ठीक आहेत. बंगालमध्ये आतापर्यंत सांडलेल्या आणि अजूनही सांडणाऱ्या हिंदूंच्या रक्ताचा दर्प काही वेगळीच कहाणी सांगतोय. त्याकडे मोदी – शहांनी लक्ष द्यावे अशी बंगाली हिंदूंची मुख्य अपेक्षा आहे.

Mamata banerjee sends mangos to PM narendra modi and amit shah… will modi – shah relent to this mango diplomacy?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात