भाजपवर आरोपांच्या फैरी झाडताना ममता बॅनर्जींनी देऊन टाकली बंगालमधल्या निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची कबुली


वृत्तसंस्था

कालीघाट : कोळसा घोटाळा प्रकरणात आपले पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्याची पत्नी रूजिरा बॅनर्जी यांना ED समन्स येताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. या भडकण्याचा भरात त्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची कबुलीच देऊन टाकली आहे.Mamata Banerjee confesses to post-election violence in Bengal

ती देताना त्यांनी भाजपवर आगपाखड कड करून घेतली आहे. त्या म्हणाल्या, की पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसाचार भाजपच्या फक्त पाच कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे, पण तृणमूल काँग्रेसच्या 16 कार्यकर्त्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरीही आम्ही घाबरत नाही. आम्ही अंगात रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत भाजपशी संघर्ष करत राहू. पण या भाषणाच्या ओघात त्यांनी हिंसाचाराबाबत कबुली देऊन टाकल्यामुळे त्याच अडचणीत आल्या आहेत.



आत्तापर्यंत ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतरचा राज्यातला हिंसाचार कायम नाकारला आहे. निवडणुकीनंतरही हिंसाचार झालेला नाही, असा दावा त्यांनी कोलकत्ता हायकोर्टात केला होता. परंतु आता भाषणाच्या भरात का होईना पण ममता बॅनर्जी यांनी स्वतःहून निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची कबुली दिल्यामुळे त्यांची राजकीय दृष्ट्या अडचण होऊ शकते. कारण पश्चिम बंगाल सरकारने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून निवडणुकीनंतरचा हिंसाचार संपूर्णपणे नाकारला आहे. या प्रतिज्ञापत्रातील युक्तिवादाशी ममता बॅनर्जी यांचे आजच्या भाषणातले विधान पूर्णपणे विसंगत आहे आणि म्हणूनच त्या राजकीयदृष्ट्या आपल्याच आक्रस्ताळे भाषणामुळे अडचणीत सापडल्याचे स्पष्ट होत आहे.

आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर एकापाठोपाठ एक बेछूट आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. ED, सीबीआयचे समन्स दाखवून भाजप आम्हाला घाबरवू शकत नाही. भाजपा आमच्यासमोर राजकारणात टिकू शकत नाही. म्हणूनच केंद्रीय तपास संस्थांचा वापर करून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना केंद्र सरकार दडपू पाहत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी काली घाट येथे केला.

जिथे जिथे भाजपने लोकशाही दडपून टाकली आहे त्या प्रत्येक ठिकाणी तृणमूल काँग्रेस घुसून भाजपला हैराण करेल असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला. तृणमूल काँग्रेस छात्रपरिषदेच्या संस्थापन दिनानिमित्त त्या बोलत होत्या.

अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या भाषणातून ममता बॅनर्जी यांचीच री ओढली. सीबीआय, ED यांच्यासारख्या तपास संस्थांच्या
नोटिसा आणि समन्स पाठवून भाजप आम्हाला घाबरवू शकणार नाही. आमचे तरुण आणि विद्यार्थी कार्यकर्ते भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुरून उरतील, असा दावा अभिषेक बॅनर्जी यांनी केला.

तृणमूल काँग्रेसमध्ये इथून पुढे तरुण कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त वाव देण्यात येईल. कारण भाजप सोशल मीडियाद्वारे तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या बदनामीची मोहीमच चालवतो आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या छात्र परिषदेने आपले विद्यार्थी कार्यकर्तेही आक्रमकपणे तयार केले पाहिजेत, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले.

त्यावेळी त्यांनी एक अजब दावाही केला. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपचे पाच कार्यकर्ते ठार झाले, तर तृणमूलच्या सोळा कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. ईडीचे समन्स आल्यानंतर ममता बॅनर्जी आणि अभिजित बॅनर्जी अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत.

Mamata Banerjee confesses to post-election violence in Bengal

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात