विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेऊन महिलांना फसविण्याचे प्रकार होतात. मात्र, याबाबत तक्रार केल्यास या महिलेवरच आरोप केले जातात. मात्र, अलाहाबाद न्यायालयाने या प्रकारांना गंभीरपणे घेण्याची सूचना केली आहे.Make it a crime to have sexual relations with false promises of marriage, make special laws for such cases, Allahabad High Court sternly directs
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रकार गुन्हा ठरवायला हवा. असे प्रकार रोखण्यासाठी स्पष्ट विशेष कायदेशीर यंत्रणा तयार करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाचे न्या. प्रदीपकुमार श्रीवास्तव यांच्या एकलपीठाने यासंदभार्तील एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने हर्षवर्धन यादव याची याचिका फेटाळली. पीडित महिलेला तो वारंवार लग्नाचे आश्वासन देत होता. नोंदणी पद्धतीच्या विवाहासाठी कागदपत्रे तयार करण्याच्या बहाण्याने तो तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तेथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिची फसवणूक केली.
अशा प्रकारावरून न्या. श्रीवास्तव यांनी कडक ताशेरे ओढले. महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी अशी प्रकरणे कठोरपणे हाताळली पाहिजेत, असे न्या. श्रीवास्ताव म्हणाले.
न्यायालयाने म्हटले आहे की, आजकाल महिलांना धोका देण्याच्या हेतूनेच गुन्हेगार लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. महिला या उपभोगाच्या वस्तू आहेत, ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महिलांसाठी लग्न खूप महत्त्वाचा भावनिक विषय असतो. त्यामुळे त्या सहज अशा जाळ्यात अडकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App