वृत्तसंस्था
हुसैनीवाला : पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळली असून फिरोजपूरच्या कार्यक्रमाला जाताना हुसैनीवाला जवळच्या उड्डाणपुलावर पंतप्रधानांच्या मोटारींचा ताफा 15 मिनिटे थांबावावा लागला. Major flaws in PM’s security in Punjab, serious breaches; Hussainiwala had to stop for 15 minutes on the flyover !!
उड्डाणपुलाजवळ काही निदर्शक थांबले होते आणि तेथे पंजाब पोलिसांची पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. पंतप्रधानांच्या सुरक्षा अधिकार्यांच्या लक्षात आल्यावर उड्डाणपुलावर गाड्यांचा ताफा थांबवण्यात आला. तेथे 15 मिनिटांपर्यंत हा ताफा थांबून होता. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा माघारी फिरवण्यात आला.
It is sad that PM’s visit to launch development projects worth thousands of crores for Punjab was disrupted… State Police was instructed to prevent people from attending the rally…CM Channi refused to get on phone to either address the matter or solve it: BJP chief JP Nadda pic.twitter.com/x1GMIn7Wj6 — ANI (@ANI) January 5, 2022
It is sad that PM’s visit to launch development projects worth thousands of crores for Punjab was disrupted… State Police was instructed to prevent people from attending the rally…CM Channi refused to get on phone to either address the matter or solve it: BJP chief JP Nadda pic.twitter.com/x1GMIn7Wj6
— ANI (@ANI) January 5, 2022
केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात अत्यंत गंभीर खुलासा केला असून पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांना माघारी फिरावे लागले, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने या संदर्भात सविस्तर खुलासा करणारे पत्रक काढले आहे. त्यामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी आणि उल्लंघन झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
पंतप्रधान भटिंडा होऊन हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथे जाणार होते. परंतु, हवामान खराब असल्याने आणि पाऊस असल्याने त्यांनी हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी रस्ते मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहोचण्यास दोन तास लागणार होते. पंतप्रधान यांचा दौरा आधी पंजाब सरकारला कळविण्यात आला होता. परंतु पंजाब सरकारने सुरक्षाव्यवस्थेची प्रोटोकॉल नुसार तयारी केली नव्हती. हुसैनीवालाच्या अलीकडे उड्डाणपुलावर पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळली. त्यामुळे गाड्यांचा ताफा 15 मिनिटे थांबवावा लागला.
केंद्रीय गृहमंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली असून पंजाब सरकारला स्पष्टपणे सूचना केल्या आहेत. सुरक्षाव्यवस्थेत नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या? सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन कसे आणि कोठे झाले?, त्याची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App