महाराष्ट्रात वज्रमूठ पडली ढिल्ली; दिल्लीत विरोधी आघाडीची गोधडी शिवली!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राची सत्ता गेल्यानंतर प्रचंड अस्वस्थता पसरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या विशिष्ट घडामोडींमुळे महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिल्ली पडली आहे, तर दुसरीकडे दिल्लीत विरोधी आघाडीची गोधडी शिवली जात आहे. Major cracks in MVA in maharashtra, but rahul Gandhi and Nitish Kumar trying to steach opposition unity in Delhi

महाराष्ट्रात गेल्या 9 महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर आहे. किंबहुना ठाकरे सरकार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर राहणे भाग पडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आपल्या प्लॅन बी नुसार काम करायला लागले आणि त्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढायला लागली. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू झाल्यानंतर 16 एप्रिलला नागपूर होणाऱ्या वज्रमुठ सभेच्या आधीच शरद पवारांनी एनडीटीव्ही आणि एबीपी माझाला मुलाखती देऊन अशी काही राजकीय चाल खेळली की त्यामुळे काँग्रेस आपोआप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटापासून दुरावली आणि पवारांचा पण प्लॅन बी पुढे सरकायला मदत झाली.

पवारांनी आधी सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले. अदानी मुद्द्यावर राहुल गांधींच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांनी एबीपी माझा दिलेल्या मुलाखती थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्यामुळे उद्धव ठाकरे पूर्वनियोजित भेटीवर सिल्वर ओकवर पोहोचले पण तिथे महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधण्याऐवजी सुप्रिया सुळे यांच्या मुलीचे करिअर आणि ताडोबा अभयारण्यावर चर्चा झाली. अर्थात महाविकास आघाडीची वज्रमूठ महाराष्ट्रात जी ढिल्ली पडायची ती पडलीच.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी नितीश कुमार, तेजस्वी यादव, लल्लनसिंह यांनी पोहोचून विरोधकांच्या आघाडीची गोधडी शिवायचा प्रयत्न चालविला. जे येतील ते विरोधक बरोबर घेऊन देशासमोर नवे व्हिजन मांडायचा संकल्प राहुल गांधींनी या भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत केला. या भेटीचे वर्णन त्यांनी ऐतिहासिक अशा शब्दाने केले. देशासाठी विरोधी ऐक्य तयार करून नवे व्हिजन मांडण्याच्या राहुल गांधींच्या संकल्पाला मल्लिकार्जुन खरेदी आणि नितीश कुमार या दोघांनीही दुजोरा दिला. त्यामुळे अर्थातच विरोधी आघाडीच्या ऐक्याच्या आशा पल्लवीत झाल्या. पण अशा आशा गेल्या काही वर्षात अनेकदा पल्लवी झाल्या आणि नंतर विझून गेल्या. शरद पवारांसारख्या काही नेत्यांनी आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांवर आपल्या वक्तव्यातून पाणी फेरले.

यावेळी महाराष्ट्रात आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने प्लॅन बी मधून आपली राजकीय चाल खेळत राष्ट्रवादी काँग्रेसला थेट नव्हे तर किमान आपल्या काही विशिष्ट घटकांना सत्तेचा वाटा मिळावा म्हणून अशा काही राजकीय हालचाली केल्या की ज्यामुळे आघाडीची वज्रमूठ दुसऱ्या सभेआधीच ढिल्ली पडली आणि त्याचवेळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पोहोचून त्यांनी विरोधी आघाडीचे गोधडी शिवायला घेतली. आता या विरोधी आघाडीच्या गोधडीत कोणत्या कोणत्या विरोधी पक्षांची ठिगळे जोडली जातात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

Major cracks in MVA in maharashtra, but rahul Gandhi and Nitish Kumar trying to steach opposition unity in Delhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात