वृत्तसंस्था
लाहोर : पाकिस्तानातील लाहोर शहरातील महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना मंगळवारी करण्यात आल्यामुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे. Maharaj Ranjit Singh Statue is Vandalism In Lahore city of Pakistan ; A wave of anger among the Sikhs
महाराज रणजित सिंह यांनी पंजाबमध्ये शिखांचे बलाढ्य साम्राज्य निर्माण केले होते. इंग्रज ज्यांच्यासमोर चळचळ कापत असत. ते जो पर्यंत होते तोपर्यंत त्यांच्या राज्यांकडे डोळे वर करून पाहण्याची किंवा ते ताब्यात घेण्याची इंग्रजांची हिम्मत झाली नव्हती. त्यांनी पंजाबमध्ये ४० वर्ष राज्य केले. भारताच्या फाळणीत पंजाबचा काही भाग पाकिस्तानात गेला. त्यामध्ये लाहोर शहराचाही समावेश आहे.
https://youtu.be/FNwPtTsraBI
लाहोर हे शहर भगवान रामाचा पुत्र लव याने वसविले होते. कालांतराने अपभ्रंश होऊन नंतर ते लाहोर असे झाले. याच लाहोर शहरात महाराजा रणजित सिंह यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा पुतळा उभारण्यात आला. मंगळवारी पाकिस्तानातील तेहरिक ए लबाईक या कट्टर संघटनेच्या धर्माधानी लाहोरच्या किल्ला परिसरात आणि कडक सुरक्षेत असलेल्या महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. अशा प्रकारे पुतळ्याची विटंबना करण्याची ही तिसरी वेळ असल्याने शीख धर्मीयांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
महाराजा रणजित सिंह यांच्या १८० व्या पुण्यतिथीदिनी जून २०१९ मध्ये हा अश्वारूढ ब्रॉन्झ धातूत पुतळा उभारला होता. तेव्हापासून कट्टर धर्मांध मुस्लिमांच्या डोळ्यात हा पुतळा सलत होता आणि आहे. यापूर्वी दोनदा पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पुतळा उभारल्यानंतर केवळ दोन महिन्यात तेहरिक ए लबाईकच्या दोन कट्टरवाद्यांनी पुतळ्याची प्रथम विटंबना केली आणि नासधूस केली. त्याची डागडुजी आठ महिन्यात करण्यात आली. आता पुन्हा पुतळ्याची विटंबना झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App