मध्यप्रदेश : सातपुडा भवन इमारतीला भीषण आग, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी हवाई दलाची मागितली मदत

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांना घटनेची दिली माहिती.

विशेष प्रतिनिधी

भोपाळ :   मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील सातपुडा भवनात सोमवारी भीषण आग लागली. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आदिवासी प्रादेशिक विकास प्रकल्पाच्या कार्यालयातून आग पसरली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनेबाबत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना माहिती दिली आहे. Madhya Pradesh fire in Satpura building Chief Minister Shivraj Singh demand helpe by airlift

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील सातपुडा भवनात भीषण आग लागली. तिसऱ्या मजल्यावरून सुरू झालेली आग काही वेळात सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. रात्री उशिरापर्यंत आग विझवता आली नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात महत्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाले आहे. ३० हून अधिक एसींचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर आग लागण्याच्या वेळेवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही आग लागली. अनुसूचित जमाती प्रादेशिक विकास योजनेच्या कार्यालयापासून ही आग लागली. त्यानंतर चौथ्या मजल्यावर असलेल्या आरोग्य संचालनालयालाही आगीने वेढले. सुरुवातीला कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आटोक्यात आणता आली नाही. एसीमध्ये स्फोट झाले, त्यामुळे आग वेगाने पसरली. आगीमुळे संपूर्ण इमारतीत एकच खळबळ उडाली. सीआयएसएफ आणि एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली. आगीचे कारण समजू शकले नाही. आधी आग विझवण्याचे काम केले जाईल, त्यानंतर नुकसानीचा अंदाज घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Madhya Pradesh fire in Satpura building Chief Minister Shivraj Singh demand helpe by airlift

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात