विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मेड इन चायना अर्थात चीनमध्ये बनणाऱ्या टेस्ला कारचे भारतात स्वागत केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे आणि जे येथे नाहीत, ते संधी गमावत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.Made in China Tesla not welcome in India, warns Nitin Gadkari
गडकरी म्हणाले, देशात आधीपासूनच बीएमडब्ल्यू, हुंडई, टोयोटा यासारख्या कंपन्यांच्या दजेर्दार गाड्या आहेत. इतकेच नाही तर टाटा आणि महिंद्रासारख्या देशी कंपन्या संशोधन आणि विकासकामात मग्न आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत विजेवर चालणाऱ्या गाड्या आणल्या जात आहेत.
या कंपन्यांनी इथेनॉल व हरित इंधनावर चालणाऱ्या गाड्या आणण्याचा इरादाही जाहीर केलेला आहे. वाहन कंपन्या फ्लेक्स इंजिनवर काम करीत आहेत. इथेनॉलमुळे शेतकºयांचा मोठा फायदा होणार आहे. सर्व क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी, हा आमचा उद्देश आहे.
दिल्ली ते मुंबई दरम्यान बनत असलेल्या ग्रीन एक्सप्रेसवे मुळे आगामी काळात लॉजिस्टिक खर्चात मोठी घट होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. ग्रीन कॉरिडॉरमुळे ट्रक्सच्या फेऱ्या कमी होतील. सध्या मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी 48 ते 54 तास लागतात, मात्र नवा कॉरिडोर बनल्यानंतर हा वेळ 18 ते 20 तासांपर्यंत खाली येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App