Lok Sabha Election 2024 : विरोधकांच्या नेतृत्वावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचं मोठं विधान, म्हणाले…

Mallikarjun Kharge New

चेन्नईमध्ये एमके स्टॅलिन यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित रथयात्रेत नोंदवला सहभाग

प्रतिनिधी

चेन्नई : आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडून एकजुटीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये सत्ताधारी पार्टी डीएमकेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या जन्मदिवसानिमित्त रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला. या दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात एक मोठं विधान केल्याचं समोर आलं आहे.

एकत्र आलेल्या विरोधकांमध्ये पंतप्रधान पदाचे उमदेवार कोण असतील, या प्रश्नावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, मी कधीच म्हटले नाही की कोण नेतृत्व करेल? तसेच, समान विचारधारेच्या विरोधी पक्षांनी विभाजनकारी ताकदीविरोधात एकत्र यायला पाहिजे. कोण नेतृत्व करेल किंवा कोण पंतप्रधान पदाचा चेहरा असेल, हा प्रश्न नाही. आपल्याला एकजुटीने लढलं पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. विशेष म्हणजे या अगोदर २०१९ मध्ये काँग्रेसने स्पष्ट केले होते की ते विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करू इच्छित आहेत.

फारुख अब्दुल्ला स्टॅलिनबद्दल केलं विधान, म्हणाले… –

विरोधकांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत फारुख अब्दुल्ला यांच म्हणणे आहे की, जेव्हा आपण सर्वजण एकत्र येवू आणि विजयी होवू. त्यावेळी ठरवले जाईल की या देशाचे नेतृत्व करण्यासाठी कोण सर्वात चांगला व्यक्ती आहे. जेव्हा त्यांना विचारले गेले की एमके स्टॅलिन पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असू शकतात का? यावर अब्दुल्ला यांनी म्हटले की, का नाही ते पंतप्रधान का नाही बनू शकत? यामध्ये चुकीचं काय आहे.

नितीश कुमारांचे विरोधकांना एकजुटीचे आव्हान –

या अगोदर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीअगोदर विरोधकांच्या एकजुटीच्या आपल्या आव्हानाचा पुनरुल्लेख करत म्हटले होते की, जर काँग्रेसह सर्व विरोधी पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढले, तर भाजपाला १०० पेक्षाही कमी जाग मिळतील.

Lok Sabha Election 2024 I never said who will lead or who will become PM Congress President Mallikarjun Kharge

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात