लोकजनशक्ती पार्टीचे चिन्ह गोठविले; चिराग आणि पशुपती पासवान या पुतण्या- काकात ‘ बंगला’ चिन्हावर संघर्ष


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीचे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले आहे. चिराग पासवान आणि पशुपती पासवान या पुतण्या आणि काकामध्ये त्यावरून वाद निर्माण झाला होता.
Lok Janshakti party symbol frozen: Chirag and Pashupati Paswan’s uncle fight over ‘Bangla’ symbol

लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी कोणी घ्यायची आणि नेतृत्व कोण करणार ? यावरून पासवान यांचा मुलगा चिराग आणि रामविलास पासवान यांचे बंधू पशुपती पासवान यांच्यात संघर्ष उफाळून आला. पक्षात दोन गट पडले आहेत.



त्यातून वादावादी आणि चिन्हावरून ताण वाढत असल्याने निवडणूक आयोगाने ते चिन्हच गोठवून टाकले आहे. त्यामुळे कोणताही गट आता पक्षाचे चिन्ह वापरु शकणार नाही. लोकजनशक्ती पार्टीला निवडणूक आयोगाने ‘बांगला’ हे चिन्ह दिले होते. आता पासवान यांच्या पक्षात (घरातच) उभी फूट पडली आहे.

चिराग आणि पशुपती पासवान यांना सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा किंवा नवीन चिन्ह आपापल्या पक्षासाठी निवडावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने दोघांना केले आहे.

Lok Janshakti party symbol frozen: Chirag and Pashupati Paswan’s uncle fight over ‘Bangla’ symbol

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”