विशेष प्रतिनिधी
लखनौ – हैदराबादच्या प्राणिसंग्रहालयात आठ सिंहाना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील इटवाह सफारी पार्क येथील दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून उपचार सुरू असल्याचे सफारी पार्कच्या संचालकांनी सांगितले.
सफारीतील दोन्ही सिंहीण कोरोनाबाधित असून तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ९ वर्षाची जेनिफर आणि चार वर्षाची गौरी यांना ३० एप्रिल रोजी ताप आला. त्यांना १०४ ते १०५ अंशाचा ताप आला होता.
त्यानंतर ३ आणि ५ मे रोजी त्यांची चाचणी करून नमुने बरेलीच्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले. बरेली येथील संशोधन केंद्रातून सहा मे रोजी अहवाल मिळाले आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेनंतर आयव्हीआरआय बरेली, सेंट्रल झू ॲथोरिटी ऑफ इंडिया, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डेहराडून यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्यात आले आणि त्यात दोन सिंहिणीची स्थिती सफारी पार्कच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली. त्यांच्या सल्ल्यानुसार दोन सिंहिणींना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App