वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजीव गांधी फाउंडेशनचे प्रदेशातून देणग्या मिळवण्याचे लायसन्स केंद्रीय गृहमंत्रालयाने रद्द केले आहे. परकीय योगदान नियंत्रण कायद्याचा भंग केल्याच्या मुद्द्यावर फाउंडेशनचे लायसन्स रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.License of Rajiv Gandhi Foundation to receive donations from abroad cancelled
राजीव गांधी फाउंडेशनच्या परदेशातल्या देणग्यांसंदर्भात चौकशी आणि तपास करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने 2020 मध्ये एक समिती नेमली होती. या समितीमध्ये अर्थ मंत्रालयाचे अधिकारी, ईडी, सीबीआय यांचे अधिकारी आदींचा समावेश होता. फाउंडेशनच्या देणगी प्रक्रियेत काही अनियमितता आढळल्याने फाउंडेशनचे परदेशातून देणग्या मिळवण्याचे लायसन्स रद्द करावे, अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार राजीव गांधी फाउंडेशनचे परदेशातून देणग्या मिळवण्याचे लायसन्स केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केले आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, सुमन दुबे, माजी केंद्रीय अर्थसचिव मॉटेंकसिंग अहलुवालिया आदी मंडळी राजीव गांधी फाउंडेशनचे विश्वस्त आहेत.
राजीव गांधी फाऊंडेशनचे देणगीदार
चिनी कम्युनिस्ट सरकार आणि चिनी दूतावास कडून 2005 – 2009 च्या 300K म्हणजे 2.50 कोटी डॉलर्सचा फंड राजीव गांधी फाऊंडेशनला मिळाला आहे. यासाठी त्या वेळच्या यूपीए सरकारने विशेष परवानगी दिली होती.
मनी लॉन्ड्रिंग करून करून परदेशात पळून गेलेला मेहुल चोक्सीने 48 कोटी रुपये देणगी दिली.
मोस्ट वॉन्टेड जिहादी झाकीर नाईक याच्याकडून 50 लाख रुपये देणगी मिळाली आहे.
येस बँकेत मनी लॉन्ड्रिंग करणारा आरोपी राणा कपूरने 10 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App