विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वत:ला डाव्या विचारांचा पाईक म्हणविणारा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने कम्युनिस्ट पक्ष सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडून जाताना कन्हैय्याने आपल्या कार्यालयात लावलेला एसीही काढून नेला. कन्हैय्यावर कम्युनिस्ट नेत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.Leaving the party and going to the Congress, he also removed the AC from his office, Communist leaders fired at Kanhaiya
कन्हैय्या कुमार याने बिहारमधील बेगुसराय येथून कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविली होती. कम्युनिस्ट पक्षाचा चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. मात्र, त्याने अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा म्हणाले की, कन्हैया कुमारने आमच्या पक्षातून स्वत:च स्वत:ला बाहेर काढून घेतले आहे.
सीपीआयने नेहमीच जातीविहीन आणि वर्गविहीन समाजासाठी लढाई लढली आहे. कन्हैया कुमारच्या स्वत:च्या काही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षा राहिल्या असतील. यावरून हे समजते की, त्याचा कम्युनिस्ट आणि वर्किंग क्लासच्या विचारसरणीवर विश्वास नव्हता.
कन्हैया कुमारच्या येण्याआधीही कम्युनिस्ट पक्ष होता आणि त्याच्या जाण्यानंतरही पक्ष कायम राहील. त्याच्या जाण्याने पक्ष संपुष्टात येणार नाही. आमचा पक्ष निस्वार्थ संघर्ष आणि बलिदानासाठी आहे. कन्हैया आमच्या पक्षासाठी स्पष्ट आणि ईमानदार राहिला नाही.
मूळचा बिहारमधील असलेला कन्हैया कुमार जेएनयूमधील कथित देशविरोधी घोषणाबाजीनंतर झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे चर्चेत आला होता. कन्हैयाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मतदारसंघातून भाजपा नेते गिरिराज सिंह यांना आव्हान दिले होते. मात्र त्या निवडणुकीत कन्हैयाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App