Praveen Togadia : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण भाई तोगडिया यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही त्यांनी अशी मागणी केली होती. ते म्हणाले की, राम मंदिर बांधण्यासाठी लाखो कारसेवक अयोध्येत पोहोचले. त्यातल्या काहींनी बलिदानही दिले. बलिदान केलेल्या करसेवकांच्या मूर्ती श्रीराम मंदिराच्या आवारात उभारण्यात याव्यात, जेणेकरून भाविकांना रामाचे दर्शन घेण्यापूर्वी बलिदान केलेल्या कारसेवकांचे दर्शनही घेता येईल. Late Balasaheb Thackeray should be given Bharat Ratna, Praveen Togadia demands again
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण भाई तोगडिया यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही त्यांनी अशी मागणी केली होती. ते म्हणाले की, राम मंदिर बांधण्यासाठी लाखो कारसेवक अयोध्येत पोहोचले. त्यातल्या काहींनी बलिदानही दिले. बलिदान केलेल्या करसेवकांच्या मूर्ती श्रीराम मंदिराच्या आवारात उभारण्यात याव्यात, जेणेकरून भाविकांना रामाचे दर्शन घेण्यापूर्वी बलिदान केलेल्या कारसेवकांचे दर्शनही घेता येईल.
ते म्हणाले की, ही खूप भाग्याची गोष्ट आहे की सुरुवातीपासूनच देवाने त्यांना राम मंदिरासाठी लढण्याची संधी दिली. मंदिर उभारणीचे श्रेय सर्व 100 कोटी हिंदू आणि कारसेवकांना जाते. चार लोकांचे नेतृत्व नसते तर मंदिर बांधले नसते, असेही ते म्हणाले. यासाठी अशोक सिंघल, गोरक्ष पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्येचे रामचंद्र परमहंस आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळावा. सोमनाथ मंदिरासाठी बलिदान देणारे वीर हमीर सिंह होते. सोमनाथ मंदिरात सरदार पटेल यांचा पुतळा बसवला होता. आजही त्यांची मूर्ती मंदिराच्या उजव्या बाजूला स्थापित आहे. अयोध्या मंदिर आंदोलनात प्राण गमावलेल्या कारसेवकांची मूर्ती मंदिर परिसरात उभारण्यात यावी जेणेकरून येथे येणाऱ्या भाविकांनाही त्यांचे दर्शन घेता येईल.
राम मंदिर आंदोलनासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, “आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून हिंदू लढत होते. शौर्य दाखवत होते. संघर्ष करत होते. त्यापैकी ६ डिसेंबरचं शौर्य हे तीन मुद्द्यांसाठी अद्वितीय आहे. आम्हाला अभिमान आहे बाबरी पाडण्यावर. जिथे एकेकाळी मशीद होती तिथे मंदिर उभारलं याचा आम्हाला अभिमान आहे. मी यामध्ये माझ्या आयुष्याची ३२ वर्षे, डॉक्टरकीचा पेशा आणि त्यातून मिळाले असते असे कोट्यवधी रुपये या कामासाठी सोडून दिल्याचा मला अभिमान आणि आनंद आहे. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी करिअर, पैसे बनवण्यासाठी जाण्याऐवजी रामाच्या जन्मभूमीमध्ये मंदिर बनवण्यासाठी पुढे आले याचा मला अभिमान आहे.” असंही तोगडिया म्हणालेत.
Late Balasaheb Thackeray should be given Bharat Ratna, Praveen Togadia demands again
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App