‘Land for Job’ Case : पाटणा, दिल्ली आणि गुरुग्रामसह देशभरात ९ ठिकाणी CBIचे छापे!

Bengal Post Poll Violence CBI probe into West Bengal, 21 cases registered

या प्रकरणात यादव कुटुंबीयांनी कथितपणे संपादित केलेल्या जमिनीची किंमत सध्या सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात सीबीआयचे पथक देशभरात नऊ ठिकाणी छापे टाकत आहे. सीबीआयने पाटणा, आराह, भोजपूर, दिल्ली आणि गुरुग्राम येथे छापे टाकले आहेत. Land for Job Case CBI raids in 9 places across the country

बिहारचे माजी मंत्री प्रेमचंद गुप्ता यांच्या घरावरही सीबीआयचे छापे पडत आहेत. यासोबतच राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जवळच्या आमदार किरण देवी यांच्या पाटणा आणि आरा घरांवरही सीबीआयने छापे टाकले आहेत. किरण देवी या माजी आमदार अरुण यादव यांच्या पत्नी आहेत. अरुण यादव हे वाळूचे मोठा व्यापारी आहे.

हे प्रकरण २००४ ते २००९ दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांना कथितपणे भेट किंवा विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये झालेल्या नियुक्त्यांशी संबंधित आहे. याचाही तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अगोदर ईडीने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरही छापे टाकले होते. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी याला सूडाची राजकारण म्हटले होते.

अंमलबजावणी संचालनालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कुटंबीयांनी नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात कथितपणे संपादित केलेल्या जमिनीची किंमत सध्या सुमारे २०० कोटी रुपये आहे. केंद्रीय यंत्रणेने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या इतर मालमत्तेची एक लांबलचक यादीही जारी केली होती आणि ही संपत्तीही यादव कुटुंबाने त्या घोटाळ्यातून मिळवल्याचे सांगितले होते.

Land for Job Case CBI raids in 9 places across the country

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात