लखीमपूर हिंसाचार प्रकरण : राकेश टिकैत म्हणाले – ट्रेन कुठे थांबवायची हे सर्वांना माहीत आहे, सरकारसोबत काहीही बोलणे झाले नाही


संयुक्त किसान मोर्चाने एका निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत लखीमपूर खेरी प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल.Lakhimpur violence case: Rakesh Tikait says – everyone knows where to stop the train, no talks with government


विशेष प्रतिनिधी

उत्तर प्रदेश : संयुक्त किसान मोर्चाने आज रेल रोको आंदोलन जाहीर केले आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची आणि अटक करण्याची मागणी करत मोर्चाने रविवारी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली.

संयुक्त किसान मोर्चाने एका निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत लखीमपूर खेरी प्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र केले जाईल.संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, रेल रोको आंदोलनादरम्यान सोमवारी रात्री १० ते दुपारी ४ या वेळेत सर्व मार्गांवर सहा तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. लखीमपूर खेरी हत्याकांडात न्याय मिळावा म्हणून संयुक्त राज्य किसान मोर्चाने गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना अटक आणि बडतर्फ करण्याची मागणी करत देशव्यापी रेल रोको कार्यक्रम जाहीर केला आहे.

एनएसए अंतर्गत केली जाणार कारवाई

यूपी, हरियाणा आणि पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लखनऊ पोलिसांनी म्हटले आहे की, शेतकरी संघटनेकडून रेल्वे रोको आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर कारवाई केली जाईल. लखनौमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.लखनऊ पोलिसांनी माहिती दिली आहे की जर कोणी परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर एनएसए लादला जाईल.

Lakhimpur violence case: Rakesh Tikait says – everyone knows where to stop the train, no talks with government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण