लखीमपूरप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू, आरोपी आशिष मिश्रा नेपाळला गेल्याची वृत्तावर कुटुंबीयांचा खुलासा -कुठेही गेले नाहीत, वकिलांसह पोलिसांसमोर हजर होणार!

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यूपी सरकारने हरीश साळवे यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचवेळी, आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा अद्याप गुन्हे शाखेसमोर हजर झालेले नाही. त्यांना आज सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. यासाठी गुरुवारी मंत्र्यांच्या घरी नोटीस चिकटवण्यात आली होती. Lakhimpur Kheri Violence Union Minister Ajay Mishra Teni Son Ashish Mishra Monu Crime Branch Akhilesh Yadav


प्रतिनिधी

लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यूपी सरकारने हरीश साळवे यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचवेळी, आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा अद्याप गुन्हे शाखेसमोर हजर झालेले नाही. त्यांना आज सकाळी 10 वाजता गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. यासाठी गुरुवारी मंत्र्यांच्या घरी नोटीस चिकटवण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष त्यांचा मित्र अंकित दाससह नेपाळला पळून गेला आहे. अंकित दास हे काँग्रेसचे माजी नेते अखिलेश दास यांचे पुतणे आहेत. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत. पोलीस तपासात लोकेशन नेपाळ होते, नंतर ते उत्तराखंडमधील बाजपुरा असल्याचे सांगितले जात आहे.

लखीमपूर खेरी पोलिसांनी नेपाळ आणि उत्तराखंड दोन्ही पोलिसांशी संपर्क साधला आहे. दरम्यान, आशिष मिश्रा तपासात पूर्ण सहकार्य करतील, असा दावा मंत्र्याचे नातेवाईक अभिजात मिश्रा यांनी केला आहे. ते वकिलासह पोलिसांसमोर हजर होतील. ते कुठेही पळून गेले नसल्याचे ते म्हणाले.

हजर न झाल्यास पोलीस काय कारवाई करणार?

वकिलांच्या मते, पोलिसांनी हजर राहण्यासाठी पहिली नोटीस दिली आहे. आरोपी न आल्यास पुन्हा नोटीस बजावली जाईल. त्यानंतरही, जर आरोपी आला नाही किंवा कारणे दिली नाहीत, तर पोलिस अटक करू शकतात.

दुसरीकडे, यूपी सरकार या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात स्टेटस रिपोर्ट दाखल करू शकते. गुरुवारी सुनावणीदरम्यान सीजेआय एन व्ही रमण्णा यांच्या खंडपीठाने हा अहवाल मागवला होता. आशिष मिश्राला अटक झाली की नाही, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला आहे.

3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या 5 दिवसानंतरही नेते पोहोचत आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूही आज लखीमपूरला पोहोचतील. ते पीडितांच्या कुटुंबीयांना भेटतील.

Lakhimpur Kheri Violence Union Minister Ajay Mishra Teni Son Ashish Mishra Monu Crime Branch Akhilesh Yadav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात