लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण, काँग्रेसचे सात सदस्यीय शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार

Congress

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरूध्द काँग्रेस पक्षातील सात सदस्यांची समिती उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी, के सी वेणुगोपाल, ए के अॅन्टोनी, गुलाम नवी आझाद, अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खारगे हे सात सदस्य रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यास जाणार आहेत.

Lakhimpur Kheri violence case, a seven-member Congress delegation will meet the President tomorrow

१३ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता ही भेट घेण्याचे ठरले आहे. या भेटीदरम्यान काँग्रेस पक्षाकडून ‘मेमोरॅण्डम ऑफ अंडरस्टँडिंग’ देखील सबमिट करण्यात येणार आहे.



लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकऱ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. याच प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीदेखील तीव्र शब्दांमध्ये निंदा केली होती. अतिशय शांततेमध्ये शेतकरी आंदोलन करत असताना, मागून भरधाव वेगाने गाडी येते आणि शेतकर्यांना अमानुषपणे मारून टाकते. अशी घटनास्थळी उपस्थित लोकांनी माहिती दिली आहे. या सर्व घटनेमध्ये एका लोकल जर्नलिस्टचाही मृत्यू झाला होता.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी बीजेपी नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा  याच्यावर आरोप केले होते. इतके पुरावे असूनही संभाव्य आरोपी म्हणून त्यांना अटक करण्याच्या ऐवजी, पोलीसांनी त्यांना स्टेशनमध्ये हजर राहण्याचे समन्स दिले होते. याउलट विरोधी पक्षनेत्या प्रियांका गांधी जेव्हा पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.

Lakhimpur Kheri violence case, a seven-member Congress delegation will meet the President tomorrow

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात