खादी ग्राम उद्योगातून वर्षभरात सव्वातीन लाखांहून अधिक रोजगार; नारायण राणे यांची ट्विटर वरून माहिती


प्रतिनिधी

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे योगदान वाढते आहे. खादी ग्रामोद्योग आयोगातून 2021 या वर्षभरात तब्बल सव्वा तीन लाखांहून अधिक रोजगार तयार झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरवरून दिली आहे.KVIC contributed in employment genartion a lot, Twittes narayan rane

खादी ग्रामोद्योग यातून रोजगाराला कशी चालना मिळाली, असे तपशील नारायण राणे यांनी सादर केले आहेत. पंतप्रधान रोजगार योजनेतून सुमारे तीन लाख रोजगार मिळाले. आहेत, त्याच बरोबर ग्रामीण उद्योगातून कारागिरांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यामध्ये वस्त्रोद्योग, हस्त उद्योग, चर्म उद्योग, हात कागद उत्पादन, मध उत्पादन, अगरबत्ती व सुगंधी द्रव्ये उत्पादन या विविध उद्योगांचा यामध्ये समावेश आहे.



या उद्योगातून ग्रामीण भागातील कुशल – अकुशल कारागिरांना तसेच शहरी भागातील तरुण लघु उद्योजकांना काम मिळाले. तसेच संबधित उत्पादने देशाच्या सर्वदूर भागात पोहचून लोकप्रिय झाली आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेसाठी हे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेतून देशाच्या संरक्षण क्षेत्रापासून ते ग्रामीण भागातल्या नव तंत्रज्ञानाचा कामापर्यंत अनेकांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

KVIC contributed in employment genartion a lot, Twittes narayan rane

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात