कोरोना रुग्णांसाठी मशिदीमध्ये उभारले कोविड सेंटर ; गुजरातमधील वडोदरात सामाजिक बांधिलकी जपली

वृत्तसंस्था

अहमदाबाद : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड्स मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांचा उपचार मिळत नसल्याने मृत्यूही होत आहे. रुग्णांचे हाल थांबविण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपत वडोदरातील जहांगीपुरा मशीदीने पुढाकार घेतला असून मशिदीतच कोविंड सेंटर बनवले आहे.Kovid Center erected in the mosque for Corona patients; Social commitment was maintained in Vadodara, Gujarat

मशीदीतील कोविड सेंटरमध्ये रुग्णालयात जागा न मिळालेले रुग्ण आता उपचार घेण्यासाठी येत आहेत. मशीदीने घेतलेल्या या निर्णयाचे देशभरातून कौतुक होत आहे. मशिदीत 50 पेक्षा अधिक बेड असलेले कोरोना सेंटर बनविण्यात आले आहे.



मशिदीच्या विश्वस्तांनी याबाबत सांगितले की, ‘ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णाची समस्या लक्षात घेत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मशीदीत आता प्रार्थनेसह रुग्णसेवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Kovid Center erected in the mosque for Corona patients; Social commitment was maintained in Vadodara, Gujarat

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात