विशेष प्रतिनिधी
दिल्ली : मेघालय मधील वेस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्यातील मुळीह या गावातील ट्रिनिटी साईओ यांना नुकताच पद्मश्री अवॉर्डने सन्मान करण्यात आले आहे. आजवर त्यांची ओळख ‘टर्मरिक ट्रिनिटी’ अशीच होती. पेशाने शिक्षिका असणार्या ट्रिनिटी यांनी हळदिची लागवड 18 वर्षांपूर्वी चालू केली हाेती.
known as ‘Turmaric Trinity’ got honored with Padma Shri for her achievements in the field of valuable turmeric production called Lakadong
लकाचीन या हळदीची लागवड सुरवातीला या भागात केली जायची. पण जेव्हा ट्रिनिटी यांनी यापेक्षा उच्च दर्जाच्या हळदीची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी शेतकर्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यास सुरूवात केली. अखेरीस 2003 मध्ये या जातीच्या लागवडीची मसाला मंडळातर्फे मिळणाऱ्या अनुदानातून सुरवात झाली.
स्वतःचे संशोधन आणि आपल्या पूर्वजांकडून मिळाल्या ज्ञानाच्या जोरावर ‘लकाडोंग’ या हळदीच्या जातीची लागवड करण्यास त्यांनी सुरूवात केली होती. ही हळद कॅन्सरसारखे आजार बरे करण्यास अतिशय उपयुक्त आहे. पण याचे अतिशय कमी प्रमाणात उत्पन्न केले जायचे हे त्यांनी हेरले. म्हणूनच त्यांनी ‘लकाडोंग’ या हळदीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली होती.
PADMA AWARDS 2021:पाकिस्तानात मृत्युदंड भारतात पद्मश्री ! ज्यांना ५० वर्षे शोधू शकला नाही पाकिस्तान ; कोण आहेत काझी सज्जाद?
बाजारात मिळणाऱ्या साधारण हळदीमध्ये करक्यूमिन या औषधी घटकाचे प्रमाण 3 ते 5 टक्के इतके असते. पण लकाडोंग या हळदीमध्ये हेच प्रमाण 12 टक्के इतके असते. म्हणून त्यांनी लकाडोंग ह्या हळदीची लागवड करण्यास सुरूवात केली. जसजशी याला मागणी वाढत गेली, तसा फायदादेखील वाढत गेला. त्यांना मिळणारा फायदा पाहून आजुबाजूच्या शेतकर्यांनी देखील या हळदीची लागवड करण्यास सुरवात केली. आणि आज तेथील एकूण 900 शेतकरी या हळदीची लागवड करताना दिसून येत आहेत. या सर्व शेतकऱ्यांना हळदीची लागवडीचे प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले आहे.
इतकं मोठं यश मिळवण्यासाठी त्यांना द स्पाइस बोर्ड ऑफ इंडियाने मोलाची मदत केली होती. ट्रिनिटी यांना त्या भागातील लोकांना प्रशिक्षण देण्यास, चर्चासत्रे घेण्यास, अभ्यासदौरे करण्यास मोलाची मदत द स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया द्वारे करण्यात आली होती. 2013 पासून त्या स्पाइस बोर्ड ऑफ इंडियाच्या मेंबर आहेत.
2018 मध्ये सुरू केलेल्या ‘मिशन लकाडोंग’ याद्वारे श्रीमती ट्रिनिटी यांनी हळदीचे उत्पन्न 2023 पर्यंत 50000 मेट्रिक टन इतके गाठण्याचे ध्येय ठेवले आहे.
आज लाईव्ह स्पाइस फेडरेशनशी संबंधित सुमारे 100 बचत गट मेघालयमध्ये सुरू आहेत. ट्रिनिटी सीईओ आहेत. आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नांमुळेच केरळ, कर्नाटक, हरयाणा, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, म्हैसूर, बिहार, उत्तर प्रदेश इत्यादी देशातील अनेक राज्यांमध्ये याचे मार्केटिंग नेटवर्क विस्तारित करण्यास मदत मिळाली आहे.
2018 मध्ये श्रीमती ट्रिनिटी यांना महिला शेतकरी दिनानिमित्त भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट फलोत्पादन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि नुकताच त्यांना भारत सरकारने 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याबद्दल आणि बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना सन्मानित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App