हिंदू तपस्वींचे बलात्कारी म्हणून चित्रण करणारे अनेक चित्रपट असल्याचेही सांगितले.
विशेष प्रतिनिधी
केरळ : ‘द केरळ स्टोरी’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती एन नागेश आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर सांगितले की, यात इस्लाम किंवा मुस्लिमांविरुद्ध काहीही नाही, तर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) बद्दल आहे. Kerala High Court refused to stay the release of The Kerala Story
खंडपीठाने टिपणी केली, “इस्लामच्या विरोधात काय आहे? धर्माविरुद्ध कोणताही आरोप नाही. आरोप ISIS विरुद्ध आहे.” “चित्रपटाचा ट्रेलर पाहता, आम्हाला असे आढळून आले की, त्यात कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी आक्षेपार्ह काहीही नाही. कोणत्याही याचिकाकर्त्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे.
खंडपीठाने मौखिकपणे टिप्पणी केली की, असे अनेक चित्रपट आहेत ज्यात हिंदू तपस्वींना तस्कर किंवा बलात्कारी म्हणून दाखवले गेले आहे परंतु यामुळे कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही. न्यायमूर्ती नागेश म्हणाले, “असे अनेक चित्रपट आहेत ज्यात हिंदू तपस्वींना तस्कर किंवा बलात्कारी म्हणून दाखवण्यात आले आहे. काहीही होत नाही, कोणीही निषेध करत नाही. असे अनेक हिंदी आणि मल्याळम चित्रपट आहेत.”
याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे म्हणाले, “फक्त एका चुकीला परवानगी दिली आहे म्हणून दुसरी चूक होऊ नये.” तसेच, तुम्ही शेवटच्या क्षणी आलात, असे खंडपीठाने सांगितले. ज्येष्ठ वकील जॉर्ज पुन्थोत्तम यांनीही याचिकाकर्त्याची बाजू मांडताना सांगितले की, चित्रपटाचा विषय हा आहे की, केरळ आयएसआयचे केंद्र आहे.
खंडपीठाने म्हटले की, ‘’आम्हाला सत्यात वास्तवात जाण्याची आवश्यकता नाही. हे काल्पनिक आहे. केवळ यासाठीच की काही धार्मिक प्रमुखांना चुकीच्या भूमिकेत दर्शवलं गेलं, म्हणून यावर प्रतिबंध आणण्याचे काहीच कारण नाही. हे प्रदीर्घ काळापासून हिंदी आणि मल्याळम चित्रपटात होत आहे.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App