गैरमुस्लिमांना संपविण्यासाठी केवळ लव्ह जिहादच नव्हे तर नार्कोटिक जिहादही, तरुण पिढी बरबाद करण्याचा डाव असल्याचा केरळच्या बिशपचा आरोप


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये गैरमुस्लिमांना संपविण्यासाठी केवळ लव्ह जिहादच नव्हे तर नार्कोटिक्स जिहादही करण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा आरोप केरळचे कॅथलिक बिशप मार जोसेफ कल्लरंगट्टा यांनी केला आहे.Kerala bishop accuses not only love jihad but also narcotics jihad for destroying non-Muslims

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुरुविलंगडमध्ये चर्चच्या एका जाहीर कार्यक्रमात कल्लरंगट्टा म्हणाले, जिहादींद्वारे केवळ लव्ह जिहाद पसरवला जात नाही तर आता नार्कोटिक जिहाददेखील पसरवला जात आहे. या लोकांना फक्त गैर मुस्लिमांना संपवायचे आहे. जे लव्ह जिहाद नावाची कोणतीही गोष्ट नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते फक्त वास्तवापासून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. याकडे फक्त प्रेमविवाह म्हणून पाहिले जाऊ नये. ही एक युद्धनीती आहे.बिशप म्हणाले,लव्ह जिहाद व्यतिरिक्त आता नार्कोटिक जिहाद देखील केरळमध्ये पसरत आहे. जिहादींना समजले आहे की, भारतासारख्या देशात कोणालाही शस्त्रास्त्रांनी संपवले जाऊ शकत नाही. या कारणास्तव, आता त्यांनी नवीन डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. या जिहादींचा एकच उद्देश आहे. त्यांचा धर्म वाढवणे आणि सर्व गैर मुस्लिमांना संपवणे. त्यांनी लव्ह जिहाद आणि नार्कोटिक जिहादचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

बिशप म्हणाले, नार्कोटिक जिहाद म्हणजे गैर-मुस्लिमांना, विशेषत: तरुणांना, ड्रग्सचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य खराब करण्याची क्रिया आहे. कट्टर जिहादींनी चालवलेल्या आइस्क्रीम पार्लर, हॉटेल्स आणि ज्यूस कॉर्नरमध्ये विविध प्रकारची ड्रग्स वापरली जात आहेत. ते गैर मुस्लिमांना बिघडवण्यासाठी विविध प्रकारची ड्रग्स शस्त्र म्हणून वापरत आहेत. 3

केरळमधील कॅथलिक मुली देखील प्रेम आणि नार्कोटिक जिहादच्या बळी ठरत आहेत. केरळमध्ये एक गट खूप सक्रिय झाला आहे. त्यांचे काम फक्त प्रेम आणि नार्कोटिक जिहाद पसरवणे आहे. केरळच्या जनतेने आता अशा सर्व लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. जिहादी मानसिकता पसरवण्याची कोणालाही परवानगी दिली जाऊ शकत नाही.

अमली पदार्थांच्या वापराला प्रोत्साहन देणाºया रेव्ह पार्ट्या आणि अशा घटनांमधून जप्त करण्यात आलेली ड्रग्स ही आपल्यासमोर नार्कोटिक जिहादची वस्तुस्थिती मांडतात. मी अशा अनेक लोकांना पाहिले ज्यांनी ड्रग्सचं व्यसन लागल्यावर नोकरी गमावली किंवा अभ्यास सोडून दिला.

Kerala bishop accuses not only love jihad but also narcotics jihad for destroying non-Muslims

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण