पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत वक्तव्यावरून केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, गुजरात कोर्टाने जारी केले समन्स

Kejriwal

या अगोदर उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठवला गेला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीशी संबंधित एका प्रकरणात गुजरातच्या न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना समन्स बजावले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अमित नायक यांनी सांगितले की, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह या दोघांनाही समन्स बजावले आहे. Kejriwals troubles escalated over PM Modis graduation statement Gujarat court issued summons

अधिवक्ता अमित नायक म्हणाले- “15 एप्रिल रोजी न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. आज (मंगळवार) सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. नव्याने समन्स जारी केले आहे, 7 जून रोजी खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे.

तत्पूर्वी, 31 मार्च रोजी गुजरात उच्च न्यायालयाने मुख्य माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश बाजूला ठेवला होता आणि निर्णय दिला होता की, पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पंतप्रधान नरेंद्र यांची पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींचे पदवी प्रमाणपत्र मागितल्याबद्दल उच्च न्यायालयाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली आणि म्हटले की पंतप्रधानांनी त्यांच्या महाविद्यालयीन पदवी सार्वजनिक कराव्यात. देशाला त्यांच्या पंतप्रधानांनी किती शिक्षण घेतले हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का? पदवी पाहण्याची मागणी करणाऱ्यांना दंड होणार का? हे काय घडतय?”

Kejriwals troubles escalated over PM Modis graduation statement Gujarat court issued summons

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात