वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तुरुंगात कैद असलेला महाठक सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना एक नवीन पत्र लिहिले आहे. सुकेश चंद्रशेखरने या पत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरातील महागड्या फर्निचरसाठी पैसे दिल्याचा दावा केला आहे. महाठक सुकेशचे हे पत्र अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा एलजी व्हीके सक्सेना यांच्या वतीने दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांना या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करण्यास आणि अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.Kejriwal himself selected the furniture for the CM’s house, took money from me, claims Sukesh Chandrasekhar
मात्र, असे सर्व आरोप आम आदमी पक्षाने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी 45 कोटी रुपये खर्च झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर फसवणूक, खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंगचे अनेक खटले सुरू आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्याला 16 फेब्रुवारी 2023 रोजी एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 3.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली.
‘केजरीवाल आणि जैन यांनी सोबत निवडले फर्निचर’
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखरने दावा केला आहे की, अरविंद केजरीवाल आणि तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन हे स्वतः महागड्या फर्निचरला प्राधान्य देतात. ज्यासाठी त्यांनी वैयक्तिक पैसे दिले होते. चंद्रशेखर यांनी त्यांचे वकील अनंत मलिक यांच्यामार्फत फर्निचरमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तू इटलीमधून आयात केल्याचा दावाही केला.
पत्रात सुकेशने आरोप केला आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात त्यांचे सरकारी निवासस्थान सार्वजनिक पैशाने आलिशान बनवल्याबद्दल चौकशी सुरू असताना, मला माझा मुद्दा ठेवायचा आहे. नूतनीकरणादरम्यान केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांना व्हॉट्सअॅप आणि फेसटाइम चॅटद्वारे पाठवलेल्या फोटोंमधून फर्निचर निवडले.
‘जेवणाच्या टेबलापासून उशीपर्यंत केली खरेदी’
सुकेश चंद्रशेखर यांनी आरोप केला आहे की त्यांनी विजनैरचे 12 सीटर डायनिंग टेबल, केजरीवाल आणि मुलांच्या बेडरूमसाठी ड्रेसिंग टेबलसह आरसे आणि उशा खरेदी केल्या आहेत. या सर्व गोष्टी फ्रान्स आणि इटलीमधून आल्या. ते माझ्या फर्मच्या बिलावर खरेदी केले होते. मी चॅट आणि इतर बिले तपास यंत्रणेला सादर करत आहे.
यासोबतच सुकेशने दावा केला की, हे सर्व फर्निचर थेट अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचवण्यात आले होते आणि त्यांचे कर्मचारी सदस्य ऋषभ शेट्टी यांनी ते बसवले होते. फर्निचरशिवाय त्यांना (केजरीवाल) चांदीची क्रॉकरीही हवी असल्याचा आरोप सुकेश यांनी केला. जी दक्षिण भारतातील एका ज्वेलर्सने दिली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App