वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी अरविंद केजरीवाल सरकारने गुरूवारी विधानसभेत दाखल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यात सरकारच्या समर्थनार्थ 58 मते पडली. तर भाजपने मतदानावर बहिष्कार टाकला. 70 सदस्यीय दिल्ली विधानसभेत आपचे 62 व भाजपचे 8 आमदार आहेत.Kejriwal govt wins trust vote 58 votes in support after 4 days of debate, BJP walkout
गुरूवारी सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होताच भाजप आमदार मद्य घोटाळ्याप्रकरणी आक्रमक झाले. त्यानंतर उपाध्यक्ष राखी बिर्ला यांनी भाजपच्या 2 आमदारांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर विधुरी म्हणाले की, मद्य घोटाळा 2 हजार कोटींचा आहे. पण आमच्या आमदारांची मुस्कटदाबी केली जात आहे.
दिल्ली विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू असताना भाजप नेत्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. आपचे सर्वच आमदार उप राज्यपालांना भेटणार आहेत. ते त्यांना निवेदन सुपूर्द करतील. केजरीवालांनी सीबीआय रेडचा संबंध गुजरात निवडणुकीला जोडला.
विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयकडून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेची भीती व्यक्त केली. ते म्हणाले – सिसोदियांना अटक झाली तर गुजरात विधानसभा निवडणुकीत आपची मतदानातील टक्केवारी वाढेल. माझ्या विरोधातही त्यांनी 16 गुन्हे दाखल केले होते. पण त्यातील 12 प्रकरणांत माझी निर्दोष सुटका झाली.
AAP चा आरोप – ऑपरेशन लोटसद्वारे आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न
सीबीआयने 19 ऑगस्ट रोजी मनीष सिसोदियांच्या निवासस्थानी धाड टाकल्यानंतर आपने भाजपवर ऑपरेशन लोटस राबवण्याचा आरोप केला. भाजप 800 कोटींचा खर्च करून आमच्या 40 आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या लोकांनी 12 आमदारांना प्रत्येकी 20 कोटी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचेही आपने म्हटले आहे.
19 ऑगस्टपासून दिल्लीतील आप व भाजपत संघर्ष
सीबीआयने अबकारी धोरणाप्रकरणी मनीष सिसोदियांच्या घरी छापेमारी केली होती. ही छापेमारी सलग 14 तास चालली. त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App