विशेष प्रतिनिधी
मोगा – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दरमहा एक हजार रुपये जमा केले जातील, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.Kejariwal assures money to women in Punjab
केजरीवालांनी याआधीच प्रत्येक घराला चोवीस तास तीनशे युनिट मोफत वीज आणि सरकारी रुग्णालयात मोफत उपचारांबरोबरच मोफत औषधे देण्याचीही घोषणा केली आहे.येथील प्रचारसभेत केजरीवाल म्हणाले की, “ पंजाबमध्ये आगामी सरकार हे आम आदमी पक्षाचे असेल.
सत्ता येताच आम्ही अठरा वर्षांवरील प्रत्येक महिलेच्या बॅंक खात्यामध्ये दरमहा एक हजार रुपयांची रक्कम जमा करू.” ज्या वृद्ध महिलांना आता एक हजार रुपयांचे निवृत्तिवेतन दिले जाते ते भविष्यात देखील सुरू राहील आणखी एक हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा विचार आहे, असे त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App