केसीआर चंद्रशेखर राव उतरले राहुल गांधींच्या समर्थनात; हेमंत विश्वशर्मांना बडतर्फ करण्याची मोदी – नड्डांकडे केली मागणी!!


प्रतिनिधी

हैदराबाद : भारत आणि पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत, याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?, असा वादग्रस्त सवाल आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा केला. त्यांच्यावर काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्यावर भडकले आहेत.KCR Chandrasekhar Rao came down in support of Rahul Gandhi

पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव हे देखील राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले असून त्यांनी मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांना बडतर्फ करण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

याआधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हेमंत विश्वशर्मा यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे टीका केली होती. आता तेलंगणात काँग्रेस विरोधात सत्तेवर आलेले तेलंगण राष्ट्र समितीचे नेते आणि मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी देखील राहुल गांधींच्या समर्थनात आणि भाजपच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. एखाद्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी अशी भाषा असू शकते? तुम्ही कोणत्या वडिलांचे पुत्र आहात?, असे एका खासदाराला विचारणे योग्य आहे का? हेमंत विश्वशर्मा यांच्या वक्तव्यामुळे माझी मान शरमेने झुकली. ही बोलण्याची पद्धत आहे का? हिंदू धर्म आपल्याला इतरांचा अपमान करायला शिकवतो का? वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता यांनी आपल्याला इतरांचा अपमान करायला शिकवले का?, असे बोचरे सवाल चंद्रशेखर राव यांनी केले आहेत.

त्याचबरोबर हिंदू धर्माला विकून मते खाणारे भाजपचे लोक घाणेरडे आहेत, अशा शेलक्या शब्दात राव यांनी भाजपवर टीका केली आहे. हेमंत विश्वशर्मा यांना आसामच्या मुख्यमंत्री पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

– नाना पटोलेही भडकले

हेमंत विश्वकर्मा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ञाच्या उपचाराची गरज आहे. तो त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावा. या उपचाराचा खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते हेमंत विश्वशर्मा?

राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?, असा सवाल हेमंत विश्वशर्मा यांनी केला होता. खासदार राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध भडकले आहे.

हेमंता विश्वशर्मा हे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज एका प्रचारसभेत सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. मग राहुल गांधी यांनी त्याचा पुरावा मागितला. लष्कराच्या कारवाईचेही तुम्हाला पुरावे कशासाठी लागतात? पाकिस्तानात घुसून आम्ही बॉम्बस्फोट घडवले असे लष्कर म्हणत असेल तर त्यांनी ते फोडलेच असे म्हणावे लागेल. त्यावर शंका घेऊन करून वाद निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. तो वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही. राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?

विश्वशर्मा म्हणाले, की जनरल रावत यांना काँग्रेसचे नेते “सडक का गुंडा” म्हणाले होते आणि आता तेच लोक त्यांच्या नावाने उत्तराखंडमध्ये मते मागत आहेत. किती हा ढोंगीपणा? कर्नाटकातील हिजाब वादावरही ते बोलले. शिक्षण सोडून हिजाबचा वाद उगाचच निर्माण करण्यात आला आहे. यामागे काँग्रेसचे व्होटबँकेचे राजकारण चालले असून काँग्रेसला एकदा नाही पुन्हा पुन्हा हरवले पाहिजे.

हेमंत विश्वशर्मा यांच्या याच भाषणामुळे नाना पटोले यांनी भडकून त्यांच्यावर मानसिक संतुलन बिघडल्याचे टीका केली आहे. वाटेल तसे बेछूट आरोप करून दुसऱ्याचे चारित्र्यहनन करणे ही भाजपची संस्कृती आहे. काँग्रेसची संस्कृती इतरांना पुढे नेण्याची आहे. हेमंत विश्वशर्मा यांनी आपल्यावर लवकरात लवकर उपचार करून घ्यावेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या उपचाराचा खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

KCR Chandrasekhar Rao came down in support of Rahul Gandhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती