काशी विश्वनाथ : लोकार्पणापूर्वी काशीनगरीत भाविकांची गर्दी, शहरातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल, घरबसल्या असा पाहा हा ऐतिहासिक सोहळा


काशीनगरी आणि महादेवाचे भक्त आपल्या आराध्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज आहेत. येथील आसमंतात बम-बम- भोलेचा गरज दुमदुमत आहे. दि. 13 डिसेंबरला येथे ऐतिहासिक लोकर्पण सोहळा होणार आहे. पीएम मोदींच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. जगभरातील शिवभक्त काशीला पोहोचत आहेत. Kashi Vishwanath Crowds of devotees in Kashinagari before the inauguration, hotels in the city are full


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काशीनगरी आणि महादेवाचे भक्त आपल्या आराध्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज आहेत. येथील आसमंतात बम-बम- भोलेचा गरज दुमदुमत आहे. दि. 13 डिसेंबरला येथे ऐतिहासिक लोकर्पण सोहळा होणार आहे. पीएम मोदींच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. जगभरातील शिवभक्त काशीला पोहोचत आहेत.

काशीचे रस्ते गजबजलेले आहेत. येथील हॉटेल्समध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. पर्यटन उद्योग व इतर व्यवसायिक भाविकांच्या गर्दीमुळे खुश आहेत. येथील 800 लहान-मोठे हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळांसह तब्बल 80 तारांकित हॉटेल्स आहेत. 12 ते 15 डिसेंबरपर्यंत सर्वत्र फुल्ल बुकिंग आहे.

यासोबतच खानपान, वाहतूक आणि इतर व्यवसायही तेजीत आले आहेत. बनारस हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गोकुल शर्मा म्हणाले की, देव दीपावलीच्या दिवशी जसे वातावरण होते त्यापेक्षा काशी शिवमय झाली आहे. काशीला दूरदूरहून लोक येत आहेत. या महिन्यापर्यंत हॉटेलचे बुकिंग फुल्ल होणार आहे. ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पर्यटन कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष राहुल मेहता म्हणाले की, महोत्सवामुळे पर्यटन उद्योगाची चांदी झाली आहे. येथे हजारो लोक येतात, हस्तकला उत्पादनांची खरेदीही करतात.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट

श्रीकाशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रविवारी वाराणसीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री दुपारी तर भाजप अध्यक्ष संध्याकाळी पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन, श्रीकाशी विश्वनाथ धामचे उद्घाटन यासह चौबेपूर येथील स्वरवेद महामंदिराच्या कार्यक्रमाचा आढावा मुख्यमंत्री योगी घेणार आहेत.

आता पंतप्रधान काशीत येईपर्यंत मुख्यमंत्री वाराणसीतच राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रविवारी संध्याकाळी वाराणसीत येणार आहेत आणि विश्वनाथ धामच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. 13 आणि 14 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. रविवारीच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूरही वाराणसीला पोहोचणार आहेत.

घरबसल्या पाहा ऐतिहासिक सोहळा

काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी काही तास उरले आहेत. तयारी अंतिम टप्प्यात आहे. 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी काशीवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा कार्यक्रम तीन दिवस भव्यदिव्य करण्यासाठी देव दिपावलीप्रमाणे घाटांवर दिवे लावण्यात येणार आहेत.

वाराणसीतील सर्व मंदिरे आणि सरकारी आणि खाजगी इमारती लेझर लाईट शोने सजवल्या जातील. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानिमित्त वाराणसीशिवाय परदेशातील विद्वान आणि ऋषीमुनींना काशीला भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

यादरम्यान पीएम मोदींसोबत एकूण 4000 लोकांच्या सहभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण वाहिन्यांसोबतच, धार्मिक स्थळे, चौकाचौकात टीव्ही स्क्रीनद्वारे केले जाणार आहे. जेणे करून ज्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचता येत नाही, त्यांनाही या भव्य सोहळ्याचा लाभ घेता येईल.

Kashi Vishwanath Crowds of devotees in Kashinagari before the inauguration, hotels in the city are full

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात