कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांचा आदर्श, कोविड केअर रुग्णालयासाठी दिले आपले घरच


कोरोनाच्या दुसºया लाटेत रुग्णालये अपुरी पडू लागल्याने अनेक ठिकाणी कोविड केअर रुग्णालये उभारण्यात येत आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी तर आपले घरच रुग्णालयासाठी दिले आहे. याठिकाणी ५० बेडची क्षमता असलेले रुग्णालय सुरूही झाले आहे.Karnataka’s Home Minister’s ideal, Kovid Care Hospital for your home


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : कोरोनाच्या दुसºया लाटेत रुग्णालये अपुरी पडू लागल्याने अनेक ठिकाणी कोविड केअर रुग्णालये उभारण्यात येत आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी तर आपले घरच रुग्णालयासाठी दिले आहे. याठिकाणी ५० बेडची क्षमता असलेले रुग्णालय सुरूही झाले आहे.

बोम्मई यांचे हावेरी जिल्ह्यातील शिगगॉँग येथे घर आहे. परिसरातील रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता नसल्याने त्यांनी आपल्या घरातच मिनी रुग्णालय उभारण्याचे ठरविले. त्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात आपले घर देऊन टाकले.शिगगॉंव हे उत्तर कर्नाटकातील छोटेसे शहर आहे. बसवराज बोम्मई हे येथून निवडून आलेले आहेत. आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सोईसाठी त्यांनी रुग्णालय उभारण्यासाठी त्यांनी स्वत:ची जागा दिली. या रुग्णालयातील सर्व बेडवर ऑक्सिजनची सुविधा आहे.

बोम्मई म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त बेडची व्यवस्था केली आहे. याठिकाणी ऑक्सिजन कॉन्संट्रेटरही पुरविण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकाच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघाची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार आमदारांनी वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Karnataka’s Home Minister’s ideal, Kovid Care Hospital for your home

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण