कर्नाटक काँग्रेसने ट्वीटरवर पीएम मोदींना अंगठेबहाद्दर म्हटले, सोशल मीडियावर संताप पाहून ट्वीट केले डिलीट, सोशल मीडिया मॅनेजरवर ढकलला दोष

कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी त्यांचे ते ट्विट काढून टाकले ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगठेबहाद्दर आणि अशिक्षित म्हटले होते. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी या ट्विटबद्दल खेद व्यक्त केला आहे. शिवकुमार म्हणाले, “कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका नवशिक्या सोशल मीडिया मॅनेजरने केलेले असभ्य ट्विट खेदजनक आहे आणि ते मागे घेण्यात आले आहे.” Karnataka Congress calls PM Modi uneducated on Twitter, deletes out of anger on social media


विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी त्यांचे ते ट्विट काढून टाकले ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगठेबहाद्दर आणि अशिक्षित म्हटले होते. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी या ट्विटबद्दल खेद व्यक्त केला आहे. शिवकुमार म्हणाले, “कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका नवशिक्या सोशल मीडिया मॅनेजरने केलेले असभ्य ट्विट खेदजनक आहे आणि ते मागे घेण्यात आले आहे.”

काय होते ते वादग्रस्त ट्वीट?

कर्नाटक काँग्रेसने कन्नडमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधीच शिकायला गेले नाहीत. प्रौढांनाही शिक्षित करण्यासाठी काँग्रेसने अनेक योजना केल्या, पण पंतप्रधानांनी इथेही काही शिकले नाही. भीक मागण्यावर बंदी असूनही ज्यांनी भीक मागणे निवडले ते आज सामान्य लोकांना भीक मागण्यासाठी प्रेरित करत आहेत. अंगठेबहाद्दर मोदींमुळे देशाला त्रास होत आहे.”

काँग्रेसने नीच पातळी गाठल्याची भाजपची टीका

काँग्रेस पक्षाच्या या ट्विटबाबत भाजप प्रवक्त्या मालविका अविनाश म्हणाल्या की, ‘फक्त काँग्रेसच इतकी खाली येऊ शकते. अशा टिप्पण्या प्रतिसाद देण्यासारख्याही नाहीत.”

30 ऑक्टोबरला दोन जागांसाठी पोटनिवडणूक

कर्नाटकातील सिंदगी आणि हंगल विधानसभा मतदारसंघात 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. जनता दल सेक्युलर आणि भाजपच्या आमदारांच्या निधनानंतर या जागा रिक्त होत्या. सत्ताधारी भाजपसाठी बरेच काही पणाला लागले आहे, कारण बीएस येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई आल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. हंगल हे नवीन मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या शिगावच्या अगदी पुढे आहे. 2023 मध्ये होणाऱ्या राज्य निवडणुकांपूर्वी पक्ष मजबूत करण्यासाठी दोन्ही जागांवर विजय अपेक्षित आहे.

Karnataka Congress calls PM Modi uneducated on Twitter, deletes out of anger on social media

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात