विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळून तीन दिवस उलटून गेले असले तरी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय घेता आलेला नाही. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यातली स्पर्धा संपायला तयार नाही. ती स्पर्धा कमी होती, म्हणून की काय आता थेट गांधी परिवारात आई विरुद्ध मुलगा अशी सुप्त स्पर्धा सुरू झाल्याची बातमी आहे.Karnataka chief ministership Crisis; Sonia Gandhi supports shiv Kumar; rahul Gandhi behind siddaramaiah
सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांची बाजू उचलून धरली आहे, तर राहुल गांधी सिद्धरामय्या यांच्या बाजूने असल्याची बातमी आहे. पण त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मात्र पेचात अडकले आहेत. सिद्धरामय्या यांना बहुसंख्या आमदारांनी पाठिंबा दिल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. पण त्याला काँग्रेस मधून कोणीच अधिकृत दुजोरा द्यायला तयार नाही. त्याचबरोबर काँग्रेस पक्ष माझी आई आहे आणि आई मुलाला सर्व काही देते असे वक्तव्य सूचक वक्तव्य शिवकुमार यांनी केले होते. याचा अर्थ सोनिया गांधी यांनी त्यांचे राजकीय वजन शिवकुमार यांच्या पारड्यात टाकल्याचे मानले जात आहे.
त्याचवेळी काँग्रेसचे तिसरे नेते जी. परमेश्वरन यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी स्वतंत्रपणे मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, तर त्यापूर्वी राहुल गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांनी खर्गे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेतले कोणतेही अधिकृत तपशील कोणीही स्वतःहून पुढे येऊन सांगितलेले नाहीत.
नव्या सचिन पायलटची भीती
काँग्रेसमध्ये प्रचंड बहुमत मिळूनही कर्नाटकात नवा “सचिन पायलट” तयार होऊ नये, याची प्रचंड काळजी घेतली जात आहे. कारण राजस्थानात एक सचिन पायलट तयार झाला तर संघटनात्मक पातळीवर अशोक गेहलोत यांचे बहुमतातील सरकार दोनदा अडचणीत आले. त्या अडचणी सोडवताना काँग्रेस श्रेष्ठींच्या नाकी नऊ आले. अर्थात त्यावेळी कोणत्याच निवडणुका नसल्यामुळे निभावून गेले. पण आता 2024 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्याआधी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सिद्धरामय्या किंवा डी. के. शिवकुमार यांच्या रूपाने नवा “सचिन पायलट” कोणी तयार व्हायला नको, अशी काँग्रेस श्रेष्ठींना भीती वाटत आहे. त्यामुळेच कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवायला विलंब होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App