कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात म्हणाले, आयाराम गयाराम संस्कृती घातक; पण सांगायला विसरले, या संस्कृतीची तर काँग्रेसच वाहक!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध शिंदे या शिवसेनेतल्या सत्ता संघर्षात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करताना आयाराम गयाराम संस्कृती पुन्हा सुरू झाल्याचे टीकास्त्र सोडले. पण आपण ज्या काँग्रेसमध्ये होतो, त्याच काँग्रेसची ही आयाराम दयाराम संस्कृती ही देन आहे, एवढे मात्र कपिल सिब्बल विसरले!!Kapil sibal targets aaya ram gaya ram culture in India politics, but forgot to tell it is a “donation” Congress itself

ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी अनेक मुद्दे मांडले. यामध्ये पक्षांतराची प्रवृत्ती, पक्षांतर बंदी कायदा आणि पक्षांतर बंदी कायद्याला बगल देऊन पक्षांतर करण्याची पुन्हा प्रवृत्ती यावर सविस्तर भाष्य केले. ते भाष्य करतानाच कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आयाराम गयाराम संस्कृती पुन्हा आली आहे. पण ती घातक आहे, असा युक्तिवाद केला. पण मूळात आयाराम गयाराम ही संस्कृती भारताच्या राजकारणात आणली कोणी??, याचा उल्लेख करायला मात्र कपिल सिब्बल विसरले!!



वास्तविक आयाराम गयाराम संस्कृती ही काँग्रेसचीच देन आहे. हरियाणातील अपक्ष आमदार गयालाल यांच्या सातत्याच्या पक्षांतरामुळे आयाराम गयाराम हा शब्दप्रयोग भारताच्या राजकारणात रूढ झाला. हे गयालाल नावाचे आमदार 1967 च्या निवडणुकीत हरियाणा विधानसभेत निवडून आले, अपक्ष म्हणून. पण एकाच दिवसात तीन वेळा पक्ष बदलणारे ते नेते ठरले. सुरवातीला ते काँग्रेसमध्ये गेले. तिथून जनता पक्षात आले. तिथून परत काँग्रेसमध्ये गेले. हे अवघ्या एका दिवसात किंबहुना नऊ तासांत घडले. त्यामुळे त्या वेळचे मुख्यमंत्री राव वीरेंद्र सिंग म्हणाले होते गया राम अब आया राम हुआ है!!, याच गया लाल आमदारावरून आयाराम गयाराम संस्कृती हे नाव पडले.

आज हीच आयाराम गयाराम संस्कृती कपिल सिब्बल यांना शिवसेनेच्या बाबतीत घातक वाटत आहे, पण ही तर काँग्रेसची देन आहे हे सांगायला कपिल सिब्बल विसरून गेले… की ते ठरवून विसरले??, ही शंका मात्र मनाला चाटून गेली.

Kapil sibal targets aaya ram gaya ram culture in India politics, but forgot to tell it is a “donation” Congress itself

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात