कन्हैया – जिग्नेशच्या स्वागतात काँग्रेस नेते गर्क; पंजाब काँग्रेसमध्ये फुटीसाठी सिद्धूंनी निवडला तोच मुहूर्त!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली / चंडीगढ ; एकीकडे कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वादग्रस्त विद्यार्थी नेत्यांच्या स्वागतात काँग्रेसचे नेते गर्क असताना दुसरीकडे पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडताना दिसत आहे.Kanhaiya – Congress leader Gerk at Jignesh’s reception; Sidhu chose the same moment for split in Punjab Congress !!

नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहेच. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे एक एक समर्थक आपल्याकडे असलेल्या पदांचे राजीनामे देत आहेत. प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष गुलजार इंद्रजीत सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. या खेरीज सिद्धू समर्थक अनेक नेते राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. 

या हालचाली इतक्या वेगाने घडत आहेत की त्याचे नेमके विश्लेषण काँग्रेस श्रेष्ठींना करता येईनासे झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करत असतानाचा मुहूर्त सिद्धू समर्थकांनी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी निवडला आहे. एक प्रकारे काँग्रेस श्रेष्ठींची त्यांनी कोंडी करण्याचे ठरवलेले दिसते.

काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या वर्षानुवर्षाचा राजकीय संस्कृतीनुसार बंडखोर व्यक्तीची इच्छा मान्य केली पण त्या व्यक्तीला त्यांनी मुख्यमंत्रिपद मिळू दिले नाही. या रागातून तसेच पंजाबमध्ये आता निर्णय प्रक्रियेत, अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही स्थान उरले नसल्याचाही रागातून नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याचे बोलले जात आहे.

त्या पाठोपाठ त्यांचे एक एक समर्थक आपले पदे सोडत आहेत. त्याची डागडुजी करण्याऐवजी राहुल गांधी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या स्वागतात गर्क झालेले दिसत आहेत.

Kanhaiya – Congress leader Gerk at Jignesh’s reception; Sidhu chose the same moment for split in Punjab Congress !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण