जमीन हडप केल्याप्रकरणी तेलंगणमध्ये आरोग्य मंत्र्याची हकालपट्टी!


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा शक्यतो कोणत्याही सत्ताधारी पक्षाचा व नेत्यांचा प्रयत्न असतो. मात्र तेलंगणमध्ये यांचया उलटा पण सुखद अनुभव आला आहे. एका शेतकऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी एक मंत्र्यांला मुख्यमंत्र्यांनी चक्क घरी पाठवले आहे. मंत्र्यांने राजीनामा न दिल्याचे त्याची चक्क हकालपट्टी करण्यात आली आहे. K chandraskekhar Rao sacked health minister in corruption case

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली जमीन अवैधरीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने तेलंगणचे आरोग्य मंत्री एटेला राजेंद्र यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल तमिळसई सौंदर्यराजन यांनी यासंबंधी आदेश दिला.

मेडकचे जिल्हाधिकारी हरिश यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करीत मुख्यमंत्री राव यांना अहवाल दिला. मेडक जिल्ह्यातील अचमपेठ आणि हकीमपेठ येथील आठ शेतकऱ्यांना सरकारने १९९४ मध्ये जमीन दिली होती. ती राजेंद्र यांनी ताब्यात घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

ही तक्रार खरी असल्याचे चौकशीत आढळून आल्याने त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी राव यांनी राज्यपाल सौंदर्यराजन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. राजेंद्र यांच्याकडून आरोग्य विभागाची सूत्रे शनिवारी (ता.१) काढून घेतली होती. मात्र तरीही त्यांनी राजीनामा न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला.

K chandraskekhar Rao sacked health minister in corruption case

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात