खटल्यामधून माघारीपूर्वी न्या. चंदा यांनी ममतादीदींना ठोठावला पाच लाखांचा दंड

विशेष प्रतिनिधी

कोलकता – नंदीग्राम विधानसभा निवडणूक प्रकरणाच्या सुनावणीतून कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौशिक चंदा यांनी माघार घेतली, मात्र त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आक्षेपार्ह प्रयत्नाबद्दल पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला.Justice before withdrawing from the case. Chanda fined Mamata Banerjee Rs 5 lakh

ममता यांनी नंदीग्राममधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. अटीतटीच्या निवडणुकीत त्यांचा १९५६ मतांनी पराभव झाला होता. हे प्रकरण न्या. चंदा यांच्याकडे सोपवू नये, कारण ते भाजपच्या जवळचे आहेत, असा आरोप ममता यांनी केला होता.यानंतर न्या. चंदा यांनी या माघारीचा निर्णय जाहीर केला, पण दंडही ठोठावला. चंदा म्हणाले की, असा योजनाबद्ध, मानसशास्त्रीय आणि आक्रमक प्रयत्न ठामपणे प्रतिरोध केलाच पाहिजे.

मी माघार घेतली नाही तर क्षुल्लक गोष्टींवरून तंटा निर्माण करण्याची सवय असणारे लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.त्याआधी तृणमूल काँग्रेसने एका छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्यात भाजपच्या विधी शाखेच्या कार्यक्रमात दिलीप घोष यांचे भाषण सुरु असताना न्या. चंदा व्यासपीठावर विराजमान असल्याचे दिसत होते.

Justice before withdrawing from the case. Chanda fined Mamata Banerjee Rs 5 lakh

महत्त्वाच्या बातम्या