जुही चावलाला न्यायालयाने फटकारले, याचिका दाखल करणे हा केवळ पब्लिसिटी स्टंट


देशात फाईव्ह जी सेवा सुरू झाल्यास त्याचा पशु-पक्षांवर काय परिणाम होईल याचा शोध घेण्याची मागणी करणारी याचिका प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला हिने केली होती. मात्र, हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत न्यायालयाने जुही चावलाला चांगलेच फटकारले आहे.Juhi Chawla was slapped by the court, saying filing the petition was just a publicity stunt


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात फाईव्ह जी सेवा सुरू झाल्यास त्याचा पशु-पक्षांवर काय परिणाम होईल याचा शोध घेण्याची मागणी करणारी याचिका प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला हिने केली होती.

मात्र, हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत न्यायालयाने जुही चावलाला चांगलेच फटकारले आहे.जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाºया हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.देशात फाइॅव्ह जी टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनावर बारकाईने विचार करुन त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी.

ही टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा.

मात्र, या याचिकेवर सुनावणीत न्यायमूर्ती मीढा म्हणाले की आम्ही अशा प्रकारची याचिका कधीही पाहिली नाही. कोणतीही माहिती न घेता ही याचिका दाखल केली आहे आणि त्याबाबत चौकशी करा असे म्हटले होते.

याचिकाकर्त्याला स्वत:च याबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे आम्ही याबाबत सुनावणी करण्यास परवानगी कशी देऊ शकतो? या याचिकेमध्ये अनेक चुका आहेत. त्यावरून हेच दिसून येते की पूर्णपणे मीडिया पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे. हे धक्कादायक आहे.

Juhi Chawla was slapped by the court, saying filing the petition was just a publicity stunt

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण