चर्चेत डोभाल २४ तासात भारतीय परराष्ट्र धोरणाची कमाल : अमेरिकेतून जॉन एफ एअर इंडिया विमान ३१८ ऑक्सिजन काँसंट्रेटर्स घेऊन दिल्लीकडे रवाना ; जो बायडेन यांचे ट्विट


भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिका पुढे आल्यापासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल चर्चेत आहेत. John F. Air India Flight 318 Oxygen Concentrators from USA to Delhi


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुख अजित डोभाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रमुख जॅके सुलीवॉन यांच्याशी चर्चा केली. या संभाषणानंतरच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅके सुलीवॉन आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोविशिल्ड लशीसाठी कच्चा माल पुरवण्याचे भारताला वचन दिले.या घोषणेनंतर अजित डोभाल ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की जिथे अजित डोभाल आहे तिथे मार्ग आहे. अमेरिकेच्या नकाराला होकारात बदलले यामुळे अजित डोभाल यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान,अमेरिकेतून जॉन एफ एअर इंडिया विमान केनेडी विमानतळावरून 318 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहे.

याशिवाय संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया या देशांनीही ऑक्सिजनच्या पुरवठ्यात भारताला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेने आपल्या जवळच्या एअरबेसला ऑक्सिजन जनरेटर्स एअर लिफ्ट करण्यास सांगितले आहे.

याशिवाय रेमेडिसिव्हिर इंजेक्शन आणि कोविशिल्ड लसीसाठी कच्च्या मालाचा पुरवठादेखील सुरू करावा. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की ते कच्चा माल भारतात पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

सौदी अरेबिया आणि युएई सोबत डोभाल यांची चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट केले आहे की, “जेव्हा आमची रुग्णालये कोरोना संकटाशी झुंज देत होती तेव्हा भारताने अमेरिकेला मदत केली.” या ट्विटसह त्यांनी अजित डोभाल आणि जेक सुलिवान यांच्यातील संभाषणही जोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार अजित डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस. के. जयशंकर यांनी अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाशी चर्चा सुरू केली आहे.

अजित डोभाल सौदी अरेबिया आणि युएई सोबत चर्चा करत असल्याचे समजते. त्याचवेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर युरोपियन युनियनशी बोलत आहेत. विशेषत: ते फ्रान्सशी देखील संपर्कात आहे.

या 9 देशांची भारताला मदत

युएईने अशी माहिती दिली आहे की ते लसची मोठी खेप भारतात पाठवत आहे. याशिवाय सौदी अरेबियातून ऑक्सिजन जनरेटरही पुरविला जात आहे. यूकेमधून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन जनरेटरही पुरवठा केला जात आहे.  कोरोना संकटात मदत करण्यासाठी भारताला आतापर्यंत एकूण 9 देशांकडून आश्वासने मिळाली आहेत.  जर्मनी, कॅनडा, यूएसए, यूके, सौदी अरेबिया, युएई, फ्रान्स आणि पाकिस्तान यासारख्या देशांनी कोरोना संकटात सामोरे जाण्यासाठी भारताला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

John F. Air India Flight 318 Oxygen Concentrators from USA to Delhi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था